मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या पादूर्भावामुळे मुंबई शहर आणि उपनगरात जमाव बंदी करण्यात आलेली आहे. येत्या 27 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेली आहे.
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने एकत्रित फिरणाऱ्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.
राज्य सरकारकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून रेल्वे स्टेशन,बस स्थानकावर प्रवास्यांची गर्दी कायम आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जमावबंदी संबंधी नव्याने आदेश जारी केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा