रविवार, २२ मार्च, २०२०

कुंभारगाव : शुकशुकाट; नागरिकांचा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद


                  छायाचित्र: अजिंक्य माने

कुंभारगाव / मान्याचीवाडी :- 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला कुंभारगाव परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कुंभारगाव,मान्याचीवाडी मध्ये शुकशुकाट होता सर्व दुकाने बंद होती. तसेच नागरिकानांही घरातच राहणे पसंद केले.कुंभारगाव परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळत कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला.परिसरातील ,आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा कार्यान्वित होती.त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

सर्व  बाजारपेेेठ हीी बंद करण्यात आल्याने जनता घराबाहेर पडलीच नाही. वडाप संघटनांनी एकजूट दाखवत जनता कर्फ्यूत सहभागी होत सहकार्य केले. एस.टी.आगाराने वाहतुक बंद ठेवत कोरोना विरोधातील कर्फ्यूला पाठिंबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...