सोमवार, २३ मार्च, २०२०

खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रॉम होम..

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. दिवसभर निवासस्थानी राहत वाचन व इतर कामे करून त्यांनी कुंटुबीयांसमवेत आपला वेळ घालविला.

'स्वतःसहित कुटुंबातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या. घराबाहेर पडू नका'असे आवाहन यानिमित्ताने खासदार पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच काळजी घ्यायची पक्के ठरवू! आपण कोरोनाला नक्की हरवू! असे म्हणत खासदार पाटील यांनी जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारंग पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडत आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...