सोमवार, २३ मार्च, २०२०

23 मार्च पासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये: उर्जामंत्र्यांनी केली मोठी घोषणा


मुंबई ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यभरात उद्यापासून कलम 144 लागू करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर परिवहन अनिल परब यांनी एसटी बसची सेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलांसदर्भात मोठी घोषणा केली आहे.

'23 मार्च पासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये. सगळे वीज बिल अॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडित करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये,' अशा सूचना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

ग्रामीण महाराष्ट्राची लालपरी थांबणार!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते 31 मार्चपर्यंत राज्य परिवहनची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक ठप्प होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...