सातारा :- कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी गर्दी करणे टाळा, भेटणे टाळा असे आवाहन सारकातर्फे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 22 तारखेला जनता करफ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. याच आवाहनास प्रतिसाद म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व पेट्राेल पंप रविवारी (ता. 22) सकाळी सहा ते साेमवारी (ता. 23) सकाळी सहा पर्यंत बंद राहतील अशी माहिती सातारा जिल्हा पेट्राेलियम डीलर्सचे अध्यक्ष माेहन बढिये यांनी दिली.
सध्या अनेक शहरातही पेट्रोल पंप बंद राहतील अशी माहिती पसरली होती. पेट्रोल पंपवर गर्दी होऊ लागताच प्रसारमाध्यमातून या अफवा असल्याचे सांगितले गेले मग ही गर्दी ओसरली. पेट्रोलियम पदार्थ जीवनाश्यक यादीत असल्याने पंप सुरू राहणार आहेत.मात्र, प्रत्येक शहरानुसार यामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा