नवी मुंबई : कामोठे परिसरातील होम क्वारन्टाईन केलेले रहिवासी घराबाहेर पडून फिरताना दिसत आहेत. घरातील तिघेही जण बाहेर येऊन फिरत असल्याने, परिसरात धास्ती आहे. कामोठे परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा संभव असल्यामुळे, पनवेल महानगरपालिका प्रशासनाने या कुटुंबातील तिन्ही सदस्यांना होम क्वारन्टाईन म्हणजेच घरी राहण्यास सांगितले होते.
कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्या सदस्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, खुद्द पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींच्या घरात जाऊन झडती घेण्याचे कार्य करत आहेत आज पोलिसांना घेऊन मनपा आयुक्तांनी घरातील सदस्यांना अचानक भेट दिली होती, पण सदस्यच घरी नसल्याने मोठा गोंधळ झाला. या तिन्ही दोषी सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा