शुक्रवार, २० मार्च, २०२०

सातारा : विलगीकरण कक्षात असलेल्या 'त्या' युवकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा, २० मार्च, : शारजाह {UAE}येथून प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील 29 वर्षे युवकाला सर्दी व घसा दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले होते.

तसेच सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेला एक 22 वर्षीय युवकाला सर्दी व ताप असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले होते. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडून प्राप्त झाले असून दोन्ही युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...