बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

स्पंदन ट्रस्ट तर्फे दिवाळी अंकांचे वितरण :

   स्पंदन ट्रस्ट तर्फे दिवाळी अंकांचे वितरण

तळमावले/वार्ताहर

दिवाळी अंक ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी व यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी दिवाळी अंकाच्या 3 प्रती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महाराष्ट्र साहित्य वर्तूळातून चांगला प्रतिसाद मिळाला.
विनाशुल्क राबवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट 3 दिवाळी अंकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येते. शिवाय सर्व सहभागींना आकर्षक सन्मानपत्र दिले जाते. स्पर्धेसाठी आलेल्या 3 दिवाळी अंकांपैकी 1 दिवाळी अंक स्पर्धेच्या रेकाॅर्डसाठी ट्रस्ट कडे जमा केला जातो तर उरलेले 2 दिवाळी अंक ग्रंथालयांना मोफत वितरित केले जातात. यानुसार स्पंदन ट्रस्ट च्या वतीने जमा झालेले दिवाळी अंक समाजभूषण डाॅ.बाबुराव गोखले ग्रंथालय विद्यानगर (कराड) व सहयाद्री मोफत वाचनालय, मल्हारपेठ यांना नुकतेच सुपुर्द करण्यात आले.
महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठी परंपरा असून एखाद्या सणानिमित्त इतक्या मोठया प्रमाणात साहित्यिक, वैचारीक, विनोदी अशा सर्व प्रकारातील लिखाण छापणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे सांगितले जाते.
या याबाबत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे म्हणाले,‘‘दिवाळीच्या फराळासोबतच वाचकांना सकस साहित्याची मेजवानी देणाऱ्या दिवाळी अंकाचा, साहित्याचा गौरव करण्यासाठी  दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाचक दिवाळी अंकाची आतुरतेेने वाट पाहत असतात. अंक निर्मितीत अनेकांचा सहभाग असतो. परंतू ते समाजापुढे येत नाहीत. तसेच दिवाळी अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांना पुढे आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेे ’’

: स्पंदन ट्रस्टचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम:
सामाजिक:
नाम फाऊंडेशनला मदत
शांताई फाउंडेषनला मदत
केरळ पुरग्रस्तांना मदत
तांबवे पुरग्रस्तांना मदत
मुख्यमंत्री सहायता निधीत मदत
एक ओंजळ अनाथांसाठी
ऊसतोड मजूरांना शाल वाटप
जवानांसाठी:
एक अक्षर गणेश कलाकृती जवानांसाठी
आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला मदत
माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना मदत
कॅलिग्राफीतून जवानांना सलाम
भारत के वीर खात्यात मदत
कॅलिग्राफीतून जवानांना सलाम
एक दिवा जवानासांठी
शैक्षणिक:
शाळेला प्रतिमा वाटप
माणुसकीच्या वहया
संगणक-बॅग वाटप
एक वही एक पेन
ज्ञानाची शिदोरी
गणवेश वाटप
वृक्षारोपण

सांस्कृतिक:
पत्रिकेतून समाजप्रबोधन
मान्यवरांचे स्वागत शाल ऐवजी पुस्तकाने
गणेशमंडळास भेटी देवून मानपत्र प्रदान
83 चित्रे रेखाटून शुभेच्छा
वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा

स्पर्धा:
सुंदर किल्ले बनवा स्पर्धा
दिवाळी अंक स्पर्धा
गणेशोत्सव वार्तांकन स्पर्धा
सॅल्युट कार्ड स्पर्धा
सेल्फी विथ गुढी स्पर्धा
नवरात्रौत्सव वार्तांकन स्पर्धा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...