शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

पूरग्रस्तांना मदत मिळवून देणार : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची ग्वाही : मांडवगण फराटा येथे पाहणी

 मांडवगण फराटा येथे पाहणी करताना 

मांडवगण फराटा- सरकार स्थापन होण्यास उशीर झाल्यामुळे पुरग्रस्तांना मदत मिळायला उशीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर परिसरातील सर्व पूरबाधितांना मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. शुक्रवारी शिवसेना उपनेते, संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी गावभेट दौऱ्यामध्ये मांडवगण फराटा गावाला भेट दिली. त्यावेळी वाघेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिरासाठी तसेच गावासाठी 25 लाख रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचे जाहीर केले.ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामपंचायतीच्या अडचणी, मांडवगण फराटा-कानगाव पुलाचे वनहद्दीतील कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा केली.ग्रामस्थांच्या वतीने आढळराव यांचा श्रीराम सोसायटीचे संस्थापक चेअरमन त्रिंबकबापू जगताप व ग्रामपंचायत सदस्य बाळनाना कोळपे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य सागर फराटे व सुरेश तावरे यांनी केला. पुणे जिल्हा युवासेना अधिकारी बापूसाहेब शिंदे यांचा सन्मान रावसाहेब जगताप व अशोक जगताप व ग्रा. प. सदस्य दिलीप फराटे यांनी केला
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार, उपजिल्हा प्रमुख पोपटराव शेलार, मांडवगण फराटाचे सरपंच शिवाजीराव कदम, उपसरपंच सुभाष पाटील फराटे, गणेगाव दुमालाचे माजी सरपंच पोपट पाटील निंबाळकर व नवनाथ दाभाडे, आंबेगाव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखिले, घोडगंगाचे माजी संचालक बाळासाहेब फराटे, ग्राहक संरक्षणचे अनिल पवार, माजी युवासेना अधिकारी संजय पवार, आबासाहेब काळे, विरेंद्र शेलार,पंडित फराटे, आनंदा ढोरजकर, नामदेव पाचुंदकर, योगेश फराटे, माऊली फराटे, कालिदास चकोर, विजय गरुड, अतुल जगताप, शरद जगताप, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, किसन भोसले, माऊली भोसले, पत्रकार राजेंद्र बहिरट, विठ्ठल गवळी, ग्रामसेवक मिलिंद केंज उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...