सातारा पाटण : प्रतिनिधी
नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी भेट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्याचा अहवाल त्यांच्याकडे सादर केला. कार्याचा अहवाल स्वीकारून ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली.
या महामंडळाच्या अध्यक्षपदाची पुन्हा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविणार असल्याबद्दल सूचित केले.
राज्य शासनाने विविध महामंडळे बरखास्त केल्याचे जाहीर केल्याने नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दि.१२ डिसेंबर रोजी सादर केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा