रविवार, २२ डिसेंबर, २०१९

आज रविवार तिनही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवार 22 डिसेंबर रोजी रेल्वेच्या पश्चिम, मध्य व हार्बर अशा तिनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात काही गाड्या रद्द करण्यात आल्याने तिनही मार्गावरील गाड्या उशीराने धावतील.
                                            जाहिरात
पश्चिम रेल्वे -
वेस्टर्न रेल्वेच्या ट्रॅक, सिग्नल व ओव्हरहेडच्या कामासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत बोरिवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान अप डाऊन दोन्ही धीम्या गतीच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.या दरम्यान गोरेगाव ते वसईरोड पर्यंत सर्व गाड्या जलद मार्गावर धावतील.

मध्य रेल्वे -
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान 9.53 ते 2.42 दरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून त्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे सर्व गाड्यांना त्यांच्या वेळेपेक्षा वीस मिनिटांचा उशीर होणार आहे. तर अप मार्गावर 10.45 ते 2.58 दरम्यान सर्व गाड्या मुंलुंड ते कुर्ला सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

हार्बर लाईन -
हार्बर लाईनवर वाशी ते पनवेल दरम्यानची डाऊन व अप मार्गावरची वाहतूक 11.30 ते 4.30 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. तर वांद्रे ते गोरेगाव दरम्यानची वाहतूकही 9.56 ते 4.58 या कालावधीत बंद राहणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...