मुंबई : महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम दरम्यान ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या देणार, असे जाहीर करण्यात आले असले तरी त्या ८० टक्के नोकऱ्या या फक्त मराठी माणसांसाठी असणार नाहीत तर जे भूमिपुत्र म्हणून स्वत:ला सिद्ध करतील त्या सगळ्यांसाठी असणार असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला़
मराठी अभ्यास केंद्राने परळ येथील आऱ एम़ भट विद्यालयात पालकप्रेमी महासंमेलन आयोजित केले आहे़ या कार्यक्रमातील चर्चासत्रात निवेदिकेने नबाव मलिक यांनी महाआघाडीच्या घोषणांबाबत प्रश्न विचारला़ ८० टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांना दिल्या जाणार आहेत, यामध्ये मराठी माणसांची टक्केवारी किती असेल, असा प्रश्न नबाव मलिक यांना विचारण्यात आला़ भूमिपुत्रांसाठी ८० टक्के राखीव असतील, असे मलिक म्हणाले़ यामध्ये मराठी माणसासाठी किती जागा असतील, असा प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला़ त्यावर मलिक यांनी वरील स्पष्टीकरण दिले़ नवीन सरकारच्या शैक्षणिक धोरणाविषयीची भूमिका विचारली असता सरकार मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करेल़ मात्र समाजात मातृभाषेतून शिक्षणाची जागृती होऊन आधी पालकांचा कल व ओढा मराठी शाळांकडे वाढायला हवा, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा