तळमावले प्रतिनिधी :
अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड.जनार्दन बोत्रे, पत्रकार आनंदराव पवार, प्रा.ए.बी.कणसे, नानासाहेब सावंत, शिवाजी सुर्वे, बाळासाहेब रोडे, पोपट माने, देवबा वायचळ व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.
नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांच्या शोेकसभेचे आयोजन ज्या ठिकाणी केले होते. त्या ठिकाणी शनिवार दि.23 नोव्हेंबर च्या दै.नवाकाळ आणि दै.संध्याकाळ च्या पहिल्या पानाचे बॅनर करुन लावले होते. तसेच 16 डिसेंबर, 2010 रोजी दै.नवाकाळच्या प्रथम पानावर लिहलेल्या अग्रलेखाच्या व इतर बातम्यांचे बॅनर लावण्यात आले होते.
शोकसभेच्या प्रारंभी भाऊंच्या प्रतिमेला हार घालून, पुजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. याचवेळी शिवसमर्थ संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामधील सर्व शाखांमध्ये एकाचवेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड जनार्दन बोत्रे, पत्रकार आनंदराव पवार, संदीप डाकवे, हेमंत तुपे, देवबा वायचळ सर व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा