शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

युती कोणी कोणाशी करावी हे सांगण न्यायालयाच काम नाही



मुंबई वार्ताहर: विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत राज्यात आघाडीचं सरकार स्थापन केलं. मात्र, या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

न्यायालयाने महाविकास आघाडीविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. कुणी कुणाशी युती करावी, हे सांगणं आमचं काम नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते प्रमोद पंडित यांनी ही याचिका केली होती.

राज्यघटनात्मक नैतिकता ही राजकीय नैतिकतेपेक्षा निराळी आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. कुणी कुणाशी युती करायची, याबाबत राजकीय पक्षांना असलेले अधिकार आम्ही कमी करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...