शनिवार, १२ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 833 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 833 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू*

  सातारा दि.12 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 833 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 38 (8043), कराड 161 (24466), खंडाळा 21 (11190), खटाव 78 (17971), कोरेगांव 114 (15627), माण 50 (12285), महाबळेश्वर 4 (4158), पाटण 57 (7624), फलटण 62 (27468), सातारा 208 (37653), वाई 31 (12098) व इतर 9 (1168) असे आज अखेर एकूण 179751 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 1 (183), कराड 9 (717), खंडाळा 0(143), खटाव 2 (445), कोरेगांव 2 (354), माण 3 (243), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (171), फलटण 2 (272), सातारा 6 (1141), वाई 1 (319) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4032 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

'मराठा समाजाला' आरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातून एक कोटी पत्र पाठविण्याचा संकल्प

'मराठा समाजाला' आरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातून एक कोटी पत्र पाठविण्याचा संकल्प 
प्रतिनिधी / मनोज सावंत 
कराड :१० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी' ही मोहीम राबविण्यात आली. 'मराठा समाजाला' आरक्षण मिळावे म्हणून नरेंद्र मोदींना  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभरातून एक कोटी पत्र पाठविण्यात येणार आहेत याची घोषणा युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी केली.
आज कराड मधून प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब, सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शना खाली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल (दादा) शिंदे यांच्या नेतृत्वखाली या मोहिमेची सुरुवात म्हणुन पत्र लिहून पोस्टात पाठवली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कराड द.उपाध्यक्ष सागर भाऊ देसाई, सुरज जाधव, विक्रम नलावडे, रोहीत कांबळे, उमेश वाटेगावकर, महेश गायकवाड, विक्रम सातपुते, अथर्व साळुंखे  उपास्थित होते

शुक्रवार, ११ जून, २०२१

*सातारा : जिल्ह्यातील एमआयडीसीत अग्निशमन केंद्र सुरु करा : खा. श्रीनिवास पाटील.*

*सातारा : जिल्ह्यातील एमआयडीसीत अग्निशमन केंद्र सुरु करा : खा. श्रीनिवास पाटील.*

कराड : प्रतिनिधी 
 औद्योगिक परिसर व तेथे काम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तासवडेसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीत अग्निशामक केंद्र सुरू करा अशा सूचना खा. पाटील यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिका-यांना केल्या.
     कराड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, एमआयडीसी, वीज वितरण कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी तासवडे( कराड) येथील एमआयडीसी मध्ये पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. उद्योजकांसमोर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व कराड येथील एमआयडीसींचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीेय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
     खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यात आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रमाणे जिल्ह्यात तशी दुर्घटना होवू नये. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात यावीत. कराड येथे व जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीमध्ये जेथे अग्निशमन केंद्रे नाहीत तेथे अग्निशमन केंद्रे सुरु करावीत. ही कार्यवाही उद्योजकांना विश्वासात घेऊन करावी अशी सूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे डेप्युटी चिफ अग्निशमन आधिकारी मिलिंद ओगले यांना केली. कामगार राज्य विमा महामंडळामार्फत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उद्योगांना वीजेचा तुटवडा भासत असून त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर उद्योजकांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी एमआयडीसीने वीज पुरवठा करणारी यंत्रणा, खराब झालेल्या तारा दुरूस्त करून घ्याव्यात. तसेच स्थानिक मागणीनुसार वीज वितरण कंपनी मार्फत येथे 110 केव्हीचे सब स्टेशन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     तत्पूर्वी तासवडे येथे एमआयडीसीची स्थापना झाल्यापासून त्या एमआयडीसीमध्ये अद्याप अग्निशमन केंद्र नाही.  अग्निशमन केंद्रासाठीची जागा एमआयडीसीने राखीव ठेवली असतानाही अग्निशमन केंद्र स्थापन झाले नाही. आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास उद्योजकांना आर्थिक नुकसान तर सहन करावे लागतेच मात्र शिवाय जीवीत हानीचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे कराड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन मार्फत अग्निशामन केंद्र सुरू करण्याची मागणी करून इतर समस्या असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, अभय नांगरे, सागर जोशी व संजय पिसाळ यांनी यावेळी उपस्थित केल्या. याशिवाय औद्योगिक परिसरात वीज पुरवठा अखंडीत सुरू रहावा, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात तो पुन्हा सुरळीत व्हावा. कामगार राज्य विमा महामंडळामार्फत हॉस्पिटल सुरू व्हावे. एमआयडीसीसाठी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला दोन जोड रस्ते सुरू करावेत. एमआयडीसी मध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटरमधील तळमजल्यावर कराड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा विविध  मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
     यावेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस.आर.तुपे, कार्यकारी अभियंता आर.एस.गावडे, प्रादेशिक अधिकारी इंगळे, डेप्युटी चीफ अग्निशामन अधिकारी मिलिंद ओगले, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री.राख, अधिक्षक अभियंता कुंभार मॅडम, राष्ट्रीय महामार्गचे वसंत पंदरकर, धनाजी साळुंखे, डीवायएसपी डॉ.रणजीत पाटील, ए.बी.पाटील, संदीप पवार, स्वप्नील जाधव, एस.डी.मोरे, पोलिस उपनिरिक्षक जयश्री पाटील, कराड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे सदस्य संजय पिसाळ, सागर जोशी, अमोल जमदाडे, अधिकराव डुबल, प्रसाद कुंभार, राजेंद्र पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, श्री.रामदुर्गकर, गिरीश ताम्हणकर, वैभव थोरात, डॉ. सुनिल मुळीक उपस्थित होते. प्रारंभी स्वागत जितेंद्र जाधव यांनी केले.आभार अभय नांगरे यांनी मानले.

*सातारा : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे आवाहन*

*सातारा : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे आवाहन*
सातारा दि.11 : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे.  दि. 1 जून 2021 पासून MHRD (www.mhrd.gov.in) या वेबसाईटवरील https://nationalawardstoteachers.education.gov.in/new_user.aspx  या लिंकवर नाव नोंदणी सुरु आहे. इच्छूक शिक्षकांनी  20जून 2021 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी  ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी केले आहे.

*सातारा जिल्ह्यातील : 751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*

 *सातारा : 751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*


सातारा दि.11 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 751 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 28 (8005), कराड 136(24305), खंडाळा 31 (11169), खटाव 135 (17893), कोरेगांव 44 (15513), माण 66 (12235), महाबळेश्वर 12 (4154), पाटण 40 (7567), फलटण 69(27406), सातारा 161 (37472), वाई 20 (12067) व इतर 9 (1159) असे आज अखेर एकूण 178945 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (182), कराड 8 (708), खंडाळा 1 (143), खटाव 3 (443), कोरेगांव 6 (352), माण 2 (240), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4(169), फलटण 3 (270), सातारा 6 (1135), वाई 3 (318) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4004 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*सातारा : शेतकऱ्यांना खते, बि - बियाणे मिळावेत यासाठी खत दुकाने शनिवारी, रविवारी सुरु ठेवावीत* *आढावा बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या सूचना*

 *शेतकऱ्यांना खते, बि - बियाणे मिळावेत यासाठी खत दुकाने शनिवारी, रविवारी सुरु ठेवावीत*

*आढावा बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या सूचना*

सातारा दि.11 : जिल्ह्यात आधूनमधून चांगला पाऊस पडत असून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची आवश्यकता आहे. कुठलाही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही यासाठी कृषी सेवा केंद्रांना शनिवार व रविवार घडण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गृह विलगीकरणामुळे कोरोनाचा प्रसार कुटुंबातच होत असल्याचे आढळून येत आहे. याला पर्याय म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना केंअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. रुग्ण बाधित आढळल्यानंतर त्याला लवकरात लवकर कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करावे. तिसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडू नयेत म्हणून आत्तापासूनच तयारी करावी. शिक्षकांना त्यांच्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची बऱ्यापैकी माहिती असल्याने उपाययोजनेच्या या कामात त्यांचा सहभाग घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केल्या.
मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटचे काम सुरु आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत केल्या.
जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीमध्ये सादर केला.


गुरुवार, १० जून, २०२१

धरणीमाता फाउंडेशन जपतया सामाजिक बांधीलकी :बांधावर जाऊन केले बियाणे वाटप

धरणीमाता फाउंडेशन जपतया सामाजिक बांधीलकी : बांधावर जाऊन केले बियाणे वाटप

तळमावले : ता.पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील धरणीमाता फाउंडेशन गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यात सदैव एक पाऊल पुढे असते.मग यामध्ये कुंभारगाव परिसरातील झांडावर पक्ष्यांच्या खान्यापिण्यासाठी जलपत्रच्या माध्यमातून हजारो पक्षांना चारा व पाणी उपलब्ध करून दिला आहे, या वर्षी कडक उन्हाळ्यात येवती रस्त्यालगत असणाऱ्या झाडांना पाण्याची सोय करणे,अनाथ आश्रमातील मुलांना मदत असे अनेक उपक्रम धरणीमाता फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले आहेत धरणीमाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.सतिष वाघ हे निसर्गप्रेमी असून त्यांनी या सेवेचे अखंड व्रतच घेतले आहे. 

सद्याचा कोरोना बिकट काळ पहाता शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली राहिलेली नाही अशा कुंभारगाव विभागातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन कडधान्येचे बियाणे वाटप करून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निखिलदादा शिंदे (राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव ) उपस्थित होते.यावेळी एकूण 25 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या 8 कडधान्याच्या बीयांनाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास धरणीमाता फाउंडेशनचे विक्रम नलवडे, अजिंक्य माने , तानाजी कळंत्रे इत्यादी उपस्थित होते.

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...