रविवार, ४ जुलै, २०२१

कुंभारगांवचा दिग्विजय ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत

कुंभारगांवचा दिग्विजय ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत

तळमावले/वार्ताहर
‘सोनी मराठी’ या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार सांयकाळी 8.30 वाजता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका प्रदर्शित होत आहे. या मालिकेत कुंभारगांवचा दिग्विजय मावळयांची भूमिका साकारत आहे. दिग्विजयला बालपणापासूनच या क्षेत्राची आवड होती. या मालिकेत असलेली भूमिका छोटी असली तरी दिग्गज कलावंतांसमवेत काम करण्याची, त्यांना पाहण्याची संधी मिळाल्याने दिग्विजय खुश आहे. त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
दिग्विजयचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. कलावंत बननण्याचे त्याने स्वप्न पाहिले असून त्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत महेश मस्कर आणि छायाचित्रकार अनिल देसाई यांच्यामुळे त्याला संधी मिळाली आहे. अभिनयबरोबरच त्याला ट्रेकींगचा देखील छंद आहे. भविष्यातही दिग्विजयला कलाक्षेत्रातील विविध संधी मिळत राहो याच शुभेच्छा..!

*सातारा जिल्ह्यातील 790 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू* *120 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 790 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू* *120 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.4 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 32 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 43 (8700), कराड 243 (28885), खंडाळा 34 (11974), खटाव 38 (19871), कोरेगांव 88 (17118), माण 27 (13307), महाबळेश्वर 6 (4306), पाटण 41 (8699), फलटण 67 (28665), सातारा 160 (41112), वाई 33 (12840) व इतर 10 (1380) असे आज अखेर एकूण 196857नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (197), कराड 7 (846), खंडाळा 0 (152), खटाव 2 (498), कोरेगांव 5 (389), माण 1 (264), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (205), फलटण 4 (287), सातारा 6 (1259), वाई 4 (340) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4482 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*120 जणांना दिला आज डिस्चार्ज*
 जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 120 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कुंभारगाव : मान्याचीवाडी येथे उद्या मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

कुंभारगाव : मान्याचीवाडी येथे उद्या मोफत डोळे तपासणी शिबीर
दि.04 कुंभारगाव मान्याचीवाडी (ता.पाटण ) येथे  प्राना फाउंडेशनच्या वतीने श्री कुमजाईदेवी 
मंदिराच्या आवारात मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उद्या सोमवार दि.05 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तसेच दि.06 जुलै रोजी ढेबेवाडी येथील प्राना फौंडेशनच्या कार्यालयात डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी कुंभारगाव व ढेबेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राना फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर*

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर* 

 कराड: माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य अभियंता, पुणे यांचेकडून या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली होती, हि कामे कार्यान्वित करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा केला होता त्याप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ६ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 

जल जीवन मिशन अंतर्गत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव गावाला ९५ लाख ४६ हजार रुपये, बामणवाडी गावाला १ कोटी १४ लाख ९६ हजार रुपये, भुरभुशी गावासाठी ३८ लाख ८५ हजार रुपये, येवती गावासाठी १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये, साळशिरंबे गावासाठी ३७ लाख ४४ हजार रुपये, कोळेवाडी गावासाठी ८५ लाख ४० हजार रुपये अश्या ६ गावांसाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जवळपास ४ कोटी ९० लाख रुपये इतका भरघोस निधी मंजूर झाला असून या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  प्रशासकीय मान्यता दिली असून या कामांची निविदा निघाल्यानंतर हि कामे लवकरच सुरु होणार आहेत. 
------------------------------------------------------

शनिवार, ३ जुलै, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत**जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी**अत्यावश्यक नसलेली दुकाने/आस्थापना या पुर्णपणे बंद राहतील.*

*सातारा जिल्ह्यातील : कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत*
*जिल्हादंडाधिकारी  यांनी केले आदेश जारी*
*अत्यावश्यक नसलेली दुकाने/आस्थापना या पुर्णपणे बंद राहतील.*

  सातारा दि. 2 : सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दि. 3 जुलै 2021 पासून ते पुढील आदेश होईपर्यंत आदेश पारित  जारी केले आहेत.  
 

*   आर्थिक /सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करणेत येत आहेत.
       सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सायं. 5.00 ते सकाळी 5-00 वाजेपर्यंन्त तसेच आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागु करणेत आलेली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरीकास संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे. 
सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवणेस परवानगी असेल. सातारा जिल्हयातील सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकौंटंट कार्यालये या आस्थापनांना सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. अत्यावश्यक बाबींची दुकाने/आस्थापना या सकाळी 9.00 ते दुपारी 02.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल/औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल/औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल.  अत्यावश्यक नसलेली दुकाने/आस्थापना या पुर्णपणे बंद राहतील. तथापि, विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 या वेळेत शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यासाठी परवानगी राहील. मॉल / सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 09.00 ते रात्री 08.00 वा. पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पुर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉप इत्यादीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करणेत येत आहेत. सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे साठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. ज्या खाजगी कार्यालयांना मुभा देण्यात आलेली आहे अशी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.  शासकीय कार्यालये व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेली आहे, अशा कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे.  खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. 
*चित्रीकरण* - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही.  तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर कोणालाही संचार / प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही.  सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल/कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25,000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आल्याचे जाहिर होत नाही तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील. जास्तीत जास्त 20 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यास परवानगी असेल. बैठका/निवडणुक - स्थानिक संस्थांच्या / सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल, अशा बांधकामांना परवानगी देणेत येत आहे. शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवस दुपारी 02.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करण्याची सेवा करण्यास आठवडयाचे सर्व दिवस सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल.  ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा या फक्त्‍ अत्यावश्यक बाबीसाठीच चालू ठेवणेस परवानगी असेल.सातारा जिल्हयात संचार बंदी लागू करण्यात येत आहे. केश कर्तनालय / सौदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठीच, अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी दुपारी 02.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी राहील. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 50 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नसेल.  मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक/ मदतनीस/ क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल.
खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच सदर कर्मचारी यांची हालचाल  TRANSPORT BUBBLE मध्ये असावी.
 *उत्पादन*- जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल / पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग, डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल.सदर कर्मचारी यांची हालचालTRANSPORT BUBBLEमध्ये असावी.
*उत्पादन* -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल ISOLATION BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील.  शिवभोजन थाळी योजना चालू ठेवणेस परवानगी असेल
*सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना* - 
      ज्या आस्थापनांना दुपारी 02.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देणेत आली आहे त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 04.00 वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी असेल.  स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.
*अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल* - 
             रुग्णालये,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स.वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन,  चिकन, अंडी,  मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा, सार्वजनिक वाहतूक - विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.  राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे,  स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा.भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा.  सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत. दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती / देखभालीसाठी आवश्यक सेवा.माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा.  शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याचेशी संबंधित संलग्न उपक्रम.  सर्व वस्तूंची निर्यात-आयात.  ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी). अधिकृत मीडिया,पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने. गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस/आयटी सेवा.सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा,  विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा,  ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स / परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस/जीवनरक्षक औषधे / फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत.  कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक,व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा.  मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने. सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी / ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा
 *सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)*
केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था.सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका.अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये.विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवा.उत्पादन/वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये.रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणिआरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन.सर्व सूक्ष्म वित्त संस्था.न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये.
*वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके* - छपाईस व वितरणास परवानगी असेल.
*'आयसोलेशन बबल'* म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातात, ज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्यांतची हालचाल.
 *दंड*- सार्वजनिक ठिकाणी / सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारणेत यावा. रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना बंद केली जाईल.
        अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर  रु  500/-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर रु.1,000/-इतका दंड आकारला जाईल. सदर कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल.
           विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांचेकडील आदेशानुसार रक्कम रुपये 500/- दंड आकारण्यात यावा. 
CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.
  सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

शुक्रवार, २ जुलै, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 804 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 25 बाधितांचा मृत्यू* *627 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 804  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 25 बाधितांचा मृत्यू*
  *627 जणांना दिला आज डिस्चार्ज*
 सातारा दि.2 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 804 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 25 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 15 (8630),  कराड 259 (28289), खंडाळा 53 (11898), खटाव 88 (19736), कोरेगांव 62 (16938), माण 52 (13275),  महाबळेश्वर 8 (4297), पाटण 30(8589), फलटण 38 (28506), सातारा 134 (40814), वाई 53 (12763) व इतर 12 (1359) असे आज अखेर एकूण 195094 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (195), कराड 9 (833), खंडाळा 2 (151), खटाव 2 (495), कोरेगांव 0 (384), माण 1 (263), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (202), फलटण 1 (283), सातारा 8 (1247), वाई 0 (336) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4434 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

       *627 जणांना दिला आज डिस्चार्ज*

       सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 627 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

गुरुवार, १ जुलै, २०२१

सातारा जिल्ह्यातील 971 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू*

 *सातारा जिल्ह्यातील 971 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.1 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 971 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 36 (8615), कराड 339 (28030), खंडाळा 57 (11845), खटाव 62 (19648), कोरेगांव 71 (16876), माण 32 (13223), महाबळेश्वर 8 (4289), पाटण 57(8559), फलटण 50 (28468), सातारा 212 (40681), वाई 40 (12710) व इतर 7 (1347) असे आज अखेर एकूण 194291 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (194), कराड 11 (824), खंडाळा 0 (149), खटाव 3 (493), कोरेगांव 1 (384), माण 1 (262), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (201), फलटण 0 (282), सातारा 2 (1239), वाई 2 (336) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4409 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...