शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिनांक २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद आदोलन

*जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी बांधवांचे थकीत असणारे आणि नेहमी उशिरा होणारे वेतन वेळेवर होण्यासाठी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा मार्फत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी एक दिवसाची किरकोळ रजा टाकून जिल्हा परिषद सातारा समोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन सातारा जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी साहेब निवेदन दिले काल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, मा.जिल्हाधिकारी,सातारा, मा पोलिस अधीक्षक सातारा, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून पगार थकल्याने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाला ऑनलाईन रिपोर्टीगचे काम बंद केले आहे. महिना अखेरपर्यंत थकीत पगार जमा न झाल्यास २ सप्टेंबरपासून काम बंद करण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
कराड तालुका आरोग्य अधिकारी साहेब व सातारा जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देताना आरोग्य कर्मचारी. याबाबत राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कराड तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र माळी साहेब निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप साळुंखे, भुंजगराव पाटील, शरद काबळे, अरविंद काळे आरोग्य सहायक तसेच शेखर पन्हाळे, रोहित भोकरे पंकज यादव, किरण पाटील, स्वप्नील सुतार, रविंद्र सुतार, दत्तात्रय गायकवाड, हेमंत कुसनाके, विनायक आरेकर आदी उपस्थित होते.

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

तळमावले - सरकारी पाहुणचार घेणार्‍या लाडक्या बहिणी आहेत 'आरोग्य सेविका'

शासकीय सेवेत असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारी पाहुणचार घेणार्‍या त्या लाडक्या बहिणी आरोग्य विभागातील असल्याचे समोर आले आहे. विभागाकडून याची शहानिशा करण्यात येत आहे.


लवकरच या लाडक्या बहिणींना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर नेमकी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यभरात जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या 1 हजार 183 महिला कर्मचार्‍यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील अश्विनी कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र कुसूंबी (ता. जावली) येथे आरोग्य सेविका, संध्या कांबळे व तनुजा बाळू झिमल या दोघी प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी (ता. माण) येथे आरोग्य सेविका, सुप्रिया गुरव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे आरोग्य सेविका, प्रियांका गार्डी तळमावले ता. पाटण येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. तर अंकिता लाडी, शुभांगी रासकर, प्रतिभा विधाते या पूर्वी आरोग्य सेविका म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. मात्र, आता त्या आरोग्य विभागात नोकरीस नाहीत तरीही त्यांची शहनिशा आरोग्य विभागमाार्फत करण्यात येत असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.

सर्वच आरोग्य सेविकांच्या पडताळणीचे काम आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर घेण्यात आले आहे. यामध्ये काही आरोग्य सेविका 11 महिन्यांच्या करारावर काम करत असून त्या बंधपत्रित आहेत. मात्र, त्यापैकी काही आरोग्य सेविका कायमस्वरूपी असतील तर त्यांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे हे चुकीचे आहे. आठ महिलांची नावे निष्पन्न झाली असून त्याची पडताळणी आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस; महिनाभरात ४० घरे पडली.

ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस; महिनाभरात ४० घरे पडली.


गेल्या महिनाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी परिसरातील विविध गावांतील ४० घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली असून.याबाबत महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत असले, तरी जुन्या घरांच्या पडझडीचा आकडा वाढत चालल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांत भीतीचे वातावरण आहे.

गेल्या महिनाभरात ढेबेवाडी, कुठरे , वाझोली, कसणी, भरेवाडी, तेटमेवाडी, लोटळेवाडी, जोशीवाडी, महिंद, पाळशी, मंद्रुळकोळे खुर्द, बनपुरी, असवलेवाडी आणि तळमावले विभागातील मानेगाव, कुंभारगाव, शेंडेवाडी, खळे, काढणे, बागलवाडी, शिद्रुकवाडी आदी गावांतील ३१ घरांची पडझड झाली होती.

आणखी नऊ घरांच्या भिंतीची पडझड झाल्याचे आज महसूल विभागाकडून सांगण्यात आले. सणबूर येथील दोन, जिंतीतील तीन, मोडकवाडीतील एक, लोटळेवाडीतील एक, गुढ्यातील एक आणि धामणीतील एका घराची पडझड झाल्याचे सांगण्यात आले.

मंडल अधिकारी नागेश निकम, मृदुला कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विशाल पाटील, अक्षय लोहार, बाळासाहेब गायकवाड, स्नेहल थोरात, पल्लवी बोंडे आदींनी नुकसानीचा पंचनामा केला.

कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार

कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार!


पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून, चोरट्यांनी बुधवारी (दि. 20) रात्री आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.याबाबत दिनकर पवार यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, पवारवाडी-कुठरे येथील दिनकर पवार यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून, चोरटे घरात प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून, चोरट्यांनी सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार, नेकलेस, सोनसाखळी, बांगड्या, अंगठी, बुगड्या, मणी आणि रोख रक्कम, असा सात लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. डॉ. दाईगडे अधिक तपास करत आहेत.

या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

'कराड दक्षिण'च्या मतदार यादीतून 'ती' नावे वगळणार; प्रांताधिकारीकापील, गोळेश्वरमध्ये बोगस मतदानाचा दावा फेटाळला.

'कराड दक्षिण'च्या मतदार यादीतून 'ती' नावे वगळणार; प्रांताधिकारी

कापील, गोळेश्वरमध्ये बोगस मतदानाचा दावा फेटाळला.


राड : विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील कापील येथे मतदान केलेल्या 'त्या' ९ मतदारांची तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी झाली असून, ते त्या ठिकाणी राहत नसल्याचा पंचनामा आहे.

यावर सुनावणी घेऊन त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली. कापील व गोळेश्वरमध्ये बोगस मतदान झाल्याचा माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांचा दावा म्हेत्रे यांनी फेटाळला आहे. 

तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

कापीलमध्ये बोगस मतदान झाल्याचे पुरावेही गणेश पवारांनी पत्रकारांना दिले आहेत. त्यात एका महिला मतदाराने कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार कार्डाच्या पुराव्यावर कापीलला मतदान केले. काही मतदारांची नावे कापील व गोळेश्वर अशा दोन्ही ठिकाणच्या मतदारयादीमध्ये आढळली आहेत. शिवाय गोळेश्वरमध्ये ७५ बोगस मतदारांची नावे आढळल्याचा गणेश पवारांचा दावा आहे.

त्यावर प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, की मतदार नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन असते. संबंधित व्यक्तींनी मतदारनोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली, याची माहिती तक्रारींच्या अनुषंगाने घेतली जाईल. ज्यांनी तक्रार केली, त्यांना या प्रकरणात फौजदारी कारवाई व्हावे असे वाटत असल्यास त्यांनी पुराव्यासह पोलिसांत तक्रार द्यावी.

दरम्यान, कापीलमध्ये झालेले मतदान बोगस आहे का, गोळेश्वरमध्ये आधारवर पत्ता नसणारे, दुसऱ्याच्या नावाचे वीज देयक पुरावा म्हणून दिलेल्यांची मतदार नोंदणी कशी झाली, कापील व गोळेश्वर दोन्ही गावांच्या मतदारयादीमध्ये एकाच व्यक्तीचे नाव कसे, कोल्हापूरच्या आधार कार्डाच्या पत्त्यावर येथे मतदारनोंदणी कशी, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या तरतुदींआधारे उत्तरे दिली. कापील, गोळेश्वरमधील ज्या मतदारांच्या तक्रारीची चौकशी करून गुन्हे दाखल करणार का, यावर त्यांनी त्यासाठी वेगळे प्राधिकरण असल्याचे सांगितले.

कापील व गोळेश्वर येथील त्या मतदारांविरोधात काय कारवाई होणार, मतनोंदणी करताना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) चुका झाल्या का, मतदारयादी सदोष आहे का, या प्रश्नांवर प्रांताधिकाऱ्यांनी कोठेही चूक नसल्याचे ठामपणे सांगितले. तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी होऊन सुनावणीसाठी तक्रारदार व संबंधितांना बोलावून कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

उत्तम माटेकर यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रधान.



उत्तम माटेकर यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रधान.


 

 – सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असलेले श्री उत्तम शामराव माटेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण महिला संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी मुंबई घणसोली येथे आयोजित भव्य समारंभात आ.विक्रांत पाटील ना.भरतनाना पाटील जेष्ठ संपादक महेश म्हात्रे सर   विजय बापू चोरमारे सर प्रमुख अतिथींच्या हस्ते माटेकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबईचे अध्यक्ष संजय रत्नाबाई किसन सावंत यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा-बारा वर्षांपासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्याना सातत्याने पुरस्कार वितरणाची परंपरा जपल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक करून आभार मानले.

माटेकर यांनी सन्मान स्वीकारताना, “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कामाचा नव्हे, तर माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. समाजसेवेचा प्रवास पुढेही तितक्याच जोमाने सुरू राहील,” असे सांगितले.

जाणता राजा युवा शक्ती सेवा भावी संस्था कुंभारगाव व शिवशक्ती गणेश मंडळ माटेकर वाडी यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे उत्तम माटेकर  समाज कार्यात अग्रेसर आहेत.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर युवा नेते चंद्रकांत चाळके साहेब,कविताताई कचरे,सुभाष बावडेकर, विक्रम मोरे,संभाजी बोत्रे,जाणता राजा सामजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर सोहळ्यास उपस्थित असलेले जाणता राजा युवा शक्ती सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी,सहकारी,शिवशक्ती गणेश मंडळ माटेकरवाडी व श्री .विठ्ठल -रखुमाई मंदिर धोत्रेवाडी व रयत सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई सहकरी हितचिंतक व मित्र परिवार व श्री.संजय रत्नाबाई किसन सावंत अध्यक्ष श्री .यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई व पदाधिकारी यांचे व ज्यांनी प्रत्येक्ष व अप्रत्यक्ष येवून शुभेच्छा त्यांचेही उत्तम माटेकर यांनी आभार मानले.

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई आयोजित यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025 पुरस्कार वितरण सोहळा आमदार विक्रांत दादा पाटील, नामदार भारत नाना पाटील, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र रिसर्च सेंटर संपादक महेश म्हात्रे सर, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र दिनमान चे संपादक विजय बापू चोरमारे, नवी मुंबई महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे ,महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या सचिव कविता ताई कचरे,सुनिशा शहा,प्रमोद नाना देशमाने, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत चाळके साहेब, यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई अध्यक्ष संजय रत्नाबाई किसन सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घनसोली या ठिकाणी पार पडला 


रविवार, १० ऑगस्ट, २०२५

*मा.श्री.रविराज देसाई यांचा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा*

*मा.श्री.रविराज देसाई यांचा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा* 
पाटण :- 
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म  व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे बंधू व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रविराज देसाई(दादा) यांचा मंगळवारी दि. 12 ऑगस्ट रोजी 54 वाढदिवस असून चालू वर्षी निष्पाप भारतीय पर्यटकांवर पेहलगामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप भारतीय पर्यटक शहिद झाले व अहमदाबाद येथील एअर इंडीयाच्या विमान दुर्घटनेमध्ये 241 प्रवाशी मृत्यमुखी पडले तसेच यंदा 20 मे पासून सुरु असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची हानी झाली आहे.त्यामुळे मा.श्री.रविराज देसाई(दादा)  यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय वाढदिवस नियेाजन समितीने घेतला असून कार्यकर्ते व हितचिंतक यांनी वाढदिवसाचे बॅनर लावू नयेत व वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊ नयेत असे आवाहनही वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.  
                      प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे वाढदिवसाचे निमित्ताने पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ,सातारा यांचे वतीने प्रतिवर्षी पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असेलल्या गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ व सेवानिवृत्त सेवकांचा सेवा गौरव समारंभ हा संयुक्तिक कार्यक्रम सातारा या ठिकाणी संपन्न होत असतो. परंतु सदरचा कार्यक्रम मा.श्री.रविराज देसाई(दादा) हे वाढदिनी सातारा या ठिकाणी उपस्थित नसल्याने यथावकाश या कार्यक्रमाची वेळ,तारीख व ठिकाण नंतर कळविणेत येईल. दरम्यान मा.श्री.रविराज देसाई(दादा) हे या दिवशी आपल्या कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असून ते शिवविजया या सातारा निवासस्थानी व दौलतनगर,ता.पाटण कारखानास्थळी उपलब्ध होणार नाहीत. तरी सातारा जिल्हा तसेच पाटण तालुक्यातील समाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर,युवा कार्यकर्ते,हितचिंतक यांना कळविणेत येते की दि. 12 ऑगस्ट रोजीचे वाढदिनी मा.श्री.रविराज देसाई(दादा) हे वाढदिवसानिमित्त फोनव्दारे व सोशल मिडीयाव्दारे शुभेच्छा स्विकारणार असल्याची माहिती शेवटी  वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत  दिली आहे.

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

कोरिवळे विकास सेवा सोसायटीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर घडवत शिवसेनेची सत्ता. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदशनाखाली सत्तांतर घडवत सर्व 12 उमेदवार विजयी.

 

कोरिवळे विकास सेवा सोसायटीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर घडवत शिवसेनेची सत्ता.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदशनाखाली सत्तांतर घडवत सर्व 12 उमेदवार विजयी.

 


दौलतनगर दि.02:- कोरिवळे विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 12 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी बहुमताने पाटणकर गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कोरिवळे विकास सेवा सोसायटीमध्ये श्री भराडीदेवी शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व उमेदवारांनी 40 वर्षानंतर सत्तांतर घडवत विजयश्री खेचून आणून सोसायटीवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

          मारुलहवेली विभागातील राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या कोरिवळे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 12 जांगसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. गेल्या महिनाभरापासून कोरिवळे सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीची लगबग सुरु होती.प्रचाराने ऐन पावसाळयामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. कोरिवळे सोसायटीसाठी एकूण 325 सभासद असून त्यापैकी 165 सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 12 जागांसाठी मतदान कार्यक्रम जाहिर झाला. त्यामधील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील जागा रिक्त राहिली. उर्वरित 12 जागांसाठी  शिवसेना व पाटणकर गट यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री भराडीदेवी शेतकरी विकास पॅनेलमधील विजयी उमेदवार किसन यशवंत दिंडे,प्रकाश आनंदा पाटील,उत्तम पिलोबा शिंदे,दिलीप शंकर शिंदे,राम दिनकर शिंदे,वसंत तुकाराम शिंदे,सुरेश हरीबा शिंदे,रघुनाथ विष्णू शिद्रुक,इंदुताई कुंडलीक शिंदे,यमुनाताई आनंदराव शिंदे,रघुनाथ विठोबा मस्के,दादासो जगन्नाथ दादासो पुजारी हे उमेदवार मोठया फरकाने निवडून आले. विजयी उमेदवारांनी निकाल घोषित होताच गुलालांची उधळण करीत व फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी शिवाजी आण्णा शिंदे, राहूल शिंदे, निवास शिंदे, सुभाष शिंदे,जालिंदर शिंदे, पांडूरंग शिंदे,हणमंत शिंदे, वाय.ए.शिंदे,विद्याधर शिंदे,वाय.टी.शिंदे,शशिकांत शिंदे,नाथा शिंदे,दादासो पाटील,सागर शिंदे,सोमनाथ शिंदे,संदेश शिंदे,शुभम शिंदे,विशाल शिंदे,पंकज शिंदे,श्रीराम शिंदे,के.वाय.दिंडे,सुरज शिद्रुक,रामभाऊ शिद्रुक,नागेश शिद्रुक यांनी परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),माजी चेअरमन अशोकराव पाटील, ॲङ मिलिंद पाटील, ॲङ डी.पी.जाधव, विजय पवार, संतोष गिरी,दादासो जाधव,आनंदा मोहिते  यांनी अभिनंदन केले.

*मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट* *'मेघदूत' निवासस्थान देण्यास सहकार्य केल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार*

 

*मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट*

*'मेघदूत' निवासस्थान देण्यास सहकार्य केल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार* 

 

*मुंबई (सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५) :* राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे रविवारी 'मेघदूत' या मुंबईतील नव्या शासकीय निवासस्थानी वास्तव्याला गेल्यानंतर सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या वास्तव्यामुळे 'मेघदूत' निवासस्थानाशी देसाई कुटुंबाच्या असलेल्या जुन्या ऋणानुबंधांशी पुन्हा एकदा जोडून घेण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.  

रविवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे मुंबईतील 'मेघदूत' या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेले. या निवासस्थानाशी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत. याचे कारण मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचे दीर्घकाळ वास्तव्य या निवासस्थानात होते. त्यामुळे देसाई कुटुंब १९६० च्या दशकात या निवासस्थानी वास्तव्याला होते. येथेच मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांचा विवाहानंतर विधिवत गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला होता. तसेच त्यांच्या पोटी मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्मही याच निवासस्थानी देसाई कुटुंबिय वास्तव्याला असताना झाला होता. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणीची सुरुवातीचे काही वर्षे याच निवासस्थानी खेळण्या-बागडण्यात गेली. त्यामुळे या निवासस्थानाबद्दल देसाई कुटुंबियांच्या भावविश्वात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. आता हेच निवासस्थान मंत्री शंभूराज देसाई यांनाही मिळाल्यामुळे 'मेघदूत'मध्ये ५५ वर्षांनंतर देसाई कुटुंबियांचे पुनर्आगमन झाले आहे. त्यात या निवासस्थानी याआधी गेली काही वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वास्तव्याला होता. त्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर ते मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमूल्य सहकार्य असल्याची भावना शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच याबद्दल आभाराचे पत्र देऊन मंत्री देसाई आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी त्यांचा मुख्यमंत्र्यांशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या योगदानाबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल मनमोकळा संवाद झाला. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, अस्मितादेवी देसाई व जयराज देसाई उपस्थित होते.

मेघदूत' या नव्या शासकीय निवासस्थानावरून मंत्री शंभूराज देसाई यांची कामकाजास सुरुवात पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठका 'मेघदूत' निवासस्थानी संपन्न.

 मेघदूत' या नव्या शासकीय निवासस्थानावरून मंत्री शंभूराज देसाई यांची कामकाजास सुरुवात


पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठका 'मेघदूत' निवासस्थानी संपन्न
 

 

मुंबई (सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५) :पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांचा 'मेघदूत' या नव्या शासकीय निवासस्थानी रविवारी गृहप्रवेश झाला. त्यानंतर सोमवारपासून त्यांनी या नव्या निवासस्थानावरून कामकाजास धडाक्यात सुरुवात केली. सोमवारी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मेघदूत निवासस्थानी बैठका घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. 

'मेघदूत' या मुंबईतील नव्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने कामकाजास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी पर्यटन विभागांतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या पर्यटन सुरक्षा दलाबाबत मेघदूत निवासस्थानी आढावा बैठक घेतली. यावेळी पहिल्या टप्प्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते गिरगाव चौपाटी या पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन तसेच पर्यटन स्थळ म्हणून आवश्यक सुरक्षा खबरदारी घेण्यासाठी पर्यटन सुरक्षा दल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. तसेच माजी सैनिक कल्याण विभागांतर्गत 'मेस्को'च्या कामकाजाबाबतही त्यांनी यावेळी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात खासगी कंपन्यांकडून देण्यात येणारा 'सीएसआर' निधी माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यास साहाय्यक ठरू शकतो. त्यामुळे सीएसआर निधी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाहीसाठी केंद्र शासनास विभागाने प्रस्ताव पत्र पाठवावे, अशी सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. याप्रसंगी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...