शनिवार, ३१ मे, २०२५

ढेबेवाडी - 35 वर्षीय नराधमाचा 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार,संशयित पोलिसांच्या ताब्यात.

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - ढेबेवाडी विभागातील एका गावात 35 वर्षीय नरधमाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून याबाबत कोणाला सांगू नको, नाही तर जिवे मारीन, अशी धमकी त्या मुलीला दिली. यासंदर्भात ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयितावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  एका गावात गुरुवार, दि. 28 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या आईला फोन करण्यासाठी गावातील नातेवाईकांच्या घराजवळ आली होती.यावेळी नात्यातील एका 35 वर्षीय मुलाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मुलीला मोबाईल बघण्याच्या निमित्ताने जवळ बोलावून घेतले व तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगायची नाही, जर सांगितलीस तर जिवे मारीन, अशी धमकी दिली.

आई घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने ही हकीकत सांगितली. याबाबत आईने ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयित नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, ढेबेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास स.पो.नि. प्रवीण दाईंगडे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...