शनिवार, ३१ मे, २०२५

पारनेरमधील ' महानगर बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार निलेश लंकेंचा एकाच उमेदवाराला पाठिंबा, प्रचाराच्या सभाही घेतल्या.

 पारनेर तालुक्यातील जी.एस. महानगर बँकेच्या निवडणुकीने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. खासदार नीलेश लंके आणि आमदार काशिनाथ दाते यांनी गीतांजली शेळके यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी सक्रियपणे पुढाकार घेतला आहे.
प्रचार सभा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग

गीतांजली शेळके यांच्या पॅनलच्या प्रचाराला गती देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी मुंबईत सभा घेतली, तर पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयात प्रचार सांगता सभा आयोजित करण्यात आली. या सभेला आमदार काशिनाथ दाते यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, वसंत चेडे, प्रभाकर कवाद, नीलेश खोडदे, किरण कोकाटे, शिवाजी वराळ, डॉ. आबासाहेब खोडदे, बाळासाहेब लामखडे, बाळासाहेब झावरे, किसन सुपेकर, ठकाराम लंके, बाळासाहेब दिघे, अशोक कटारिया, किसन रासकर, शिवाजी बेलकर, शिवाजी औटी, पॅनलप्रमुख गीतांजली शेळके, सि.बा. अडसूळ, भास्कर खोसे आणि भास्कर कवाद यांसारखे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आणि बँकेचा गुलाबराव शेळके यांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले.
गुलाबराव शेळके यांचा वारसा आणि बँकेचे योगदान

आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात गुलाबराव शेळके यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, गुलाबराव शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी.एस. महानगर बँकेची स्थापना करून पारनेर तालुक्यातील अनेक लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. हा वारसा पुढे नेण्यासाठी गीतांजली शेळके सक्षम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बँकेने तालुक्यातील आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, स्थानिक नागरिकांना स्वावलंबी बनवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. गीतांजली शेळके यांनीही आपल्या भाषणात बँकेच्या या योगदानाला उजाळा देत, हा वारसा जपण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

राजकीय एकजुटीचे प्रदर्शन

या निवडणुकीत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून अनेक नेत्यांनी गीतांजली शेळके यांच्या पॅनलला पाठिंबा दर्शवला आहे. गीतांजली शेळके यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले, ज्यांनी या निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला. खासदार नीलेश लंके आणि आमदार काशिनाथ दाते यांनीही आपापल्या प्रभावक्षेत्रात प्रचार करून गीतांजली शेळके यांच्या पॅनलला बळ दिले आहे.

ढेबेवाडी - 35 वर्षीय नराधमाचा 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार,संशयित पोलिसांच्या ताब्यात.

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - ढेबेवाडी विभागातील एका गावात 35 वर्षीय नरधमाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून याबाबत कोणाला सांगू नको, नाही तर जिवे मारीन, अशी धमकी त्या मुलीला दिली. यासंदर्भात ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयितावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  एका गावात गुरुवार, दि. 28 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या आईला फोन करण्यासाठी गावातील नातेवाईकांच्या घराजवळ आली होती.यावेळी नात्यातील एका 35 वर्षीय मुलाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मुलीला मोबाईल बघण्याच्या निमित्ताने जवळ बोलावून घेतले व तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगायची नाही, जर सांगितलीस तर जिवे मारीन, अशी धमकी दिली.

आई घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने ही हकीकत सांगितली. याबाबत आईने ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयित नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, ढेबेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास स.पो.नि. प्रवीण दाईंगडे करत आहेत.

सोमवार, २६ मे, २०२५

साताऱ्याला 'रेड अलर्ट', घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज .

 

  

जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, फलटण तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. एरवी कोरड्या दिसणाऱ्या माणगंगा आणि बाणगंगा नदीला पूर आला असून मोरी, पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या दोन्ही तालुक्यात पावसामुळं काही ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. तर, शेतांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

बाणगंगा नदीला पूर : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १६३.५ मिलीमीटर पावसाची नोंद फलटण तालुक्यात झाली आहे. मुसळधार पाऊस झाल्यानं बाणगंगा नदीला पूर आलाय. तालुक्यातील छोटे-मोठे बंधारे ओसंडून वाहत आहेत. अनेक रस्ते आणि रस्त्यांवरील साकव पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्गावरील वाहतूक २० ते २२ तासांपासून बंद आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळं १६ गावांचा संपर्क तुटला आहे. तर, १२३ कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे. बाणगंगा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. रस्त्यावरील पाण्यात वाहने न घालण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

माण तालुक्याला पावसानं झोडपलं : माण तालुक्याला पावसानं अक्षरशः झोपडून काढलं आहे. त्यामुळं माणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. बंधारे ओव्हरफ्लो झाले असून शेती खरवडून गेली आहे. माण तालुक्यात उन्हाळ्यात एखाद्या वर्षी वळीव पावसाचं तांडव पाहायला मिळायचं. मात्र, असा पाऊस हा पहिल्यांदाच बघत असल्याचं ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. माणगंगा नदीला आलेल्या पुरामुळं प्रशासनानं दवंडी पिटून नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलय. माण तालुक्यातील खडकी (तुपेवाडी) येथील पाझर तलाव, आंधळी धरण ओसंडून वाहत असून तहसीलदारांनी परिस्थितीची पाहणी केली.

प्रसिध्द धबधबे झाले प्रवाहीत : मान्सून पूर्व पावसानं सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द धबधबे प्रवाहीत झाले आहेत. महाबळेश्वरमधील लिंगमळा, पाटण तालुक्यातील नवजाचा ओझर्डे धबधबा फेसाळत कोसळू लागला आहे. त्यामुळं पर्यटकांची पावले आता धबधब्यांकडं वळू लागली आहेत. सुट्टीच्या दिवसात याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत असून पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

साताऱ्याला 'रेड अलर्ट' : सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळं सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळं घाट मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढला आहे.

सातारा जिल्ह्यात पडझडीचं सत्र : मुसळधार पावसामुळं जिह्यात घरांच्या पडझडीचं सत्र सुरू आहे. रविवारच्या दिवसभरातील आकडेवारीनुसार ११ घरांची अंशतः पडझड झाली असून दोन विहिरी खचल्या आहेत. पाच रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण तालुक्यातही पावसाचा जोर आहे. त्यामुळं कच्च्या घरांची पडझड झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे.

 

बुधवार, २१ मे, २०२५

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी.पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर..

 साताऱ्यातून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज दुपारी 3:15 वाजता साताऱ्यातील कलेक्टर ऑफिस उडवून देणार असल्याची दिली धमकी मिळाली आहे.


एका अज्ञात व्यक्तीने चेन्नई वरून हा धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. या धमकीमुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला महत्वाची बाब म्हणजे आज सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज उडवून देण्याच्या धमकीचा फोन झाला होता अन् आता जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यालयातील सर्व दुचाकी, चारचाकी गाड्या बाहेर काढण्यात आल्या.. एकीकडे पावसाचं वातावरण असतानाही भर पावसात बॉम्ब स्कॉड पथक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झालं असून शोधकार्य सुरू आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...