शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

*"एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी" ; सलग 8 व्या वर्षी डॉ.संदीप डाकवे यांचा उपक्रम*

*"एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी" ; सलग 8 व्या वर्षी डॉ.संदीप डाकवे यांचा उपक्रम*
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संवेदनशील अक्षरगणेश कलावंत शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यानी ‘‘एक अक्षर गणेशा रुग्णांसाठी’’ हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून घ्यायचा त्या बदल्यात त्यांना रु.200/- चे मूल्य द्यायचे आहे. हे मूल्य गरीब, गरजू रुग्णांसाठी देण्यात येणार आहे. यामुळे आपणास अक्षरगणेशा मिळेलच परंतू  
गरजूंना मदत केल्याचे समाधानही मिळेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केला आहे. 7 सप्टेंबरला लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. मंगळवार दि.17 सप्टेंबर, 2024 अखेर हा उपक्रम चालणार आहे. डाॅ.डाकवे यांनी अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 8 वे वर्ष आहे. डाॅ.संदीप डाकवे हे गेली सुमारे 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे. डॉ.संदीप डाकवे यानी कलेच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुपयाची रोख मदत केली आहे.  सार्वजनिक मंडळानी अक्षरगणेशा उपक्रम राबवल्यास रुग्णांसाठी भरघोस मदत करता येईल. डॉ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मंदीर जीर्णोद्धारासाठी रु.51 हजार, नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु. 21 हजार, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.6 हजार, मंदिर, ईर्षाळवाडी आपत्तिग्रस्तांसाठी साठी रु.5 हजार 555, ईशिता पाचुपते रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला रु.4 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस रु.3 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, भारत के वीर या खात्यात रु.1 हजार अशी रोख स्वरुपात मदत केली आहे. या बरोबरच डॉ.डाकवे यानी एक लाखाहून जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य विविध शाळांना दिले आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे हे जाहीररीत्या कबूल करतात. 
"एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी" या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.

*चौकटीत :* डॉ.संदीप डाकवे यांच्या अक्षर गणेशा उपक्रमाचे कौतुक :

डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा तर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये दोनदा झाली आहे. याशिवाय इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी 30 पेक्षा जास्त स्पेशल रिपोर्ट तर सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवर अर्ध्या तासाची मुलाखत प्रसारित केली आहे. डॉ.संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 75 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 6 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

सुभाष बावडेकर यांच्या अध्यक्षीय काळात वांगव्हॅली को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रगतीच्या दिशेने- मेघना काकडे- मानेसहकार क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक सुभाष बावडेकर यांचे प्रतिपादन.

 सुभाष बावडेकर यांच्या अध्यक्षीय काळात वांगव्हॅली को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रगतीच्या दिशेने- मेघना काकडे- माने

सहकार क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक सुभाष बावडेकर यांचे  प्रतिपादन.



भांडुप मुंबई दि.25.08.2024   सुभाष बावडेकर यांच्या अध्यक्षीय काळात वांगव्हॅली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रगतीच्या दिशेने कामकाज करत आहे असे मत पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेघना काकडे-माने यांनी केले आहे. भांडुप या ठिकाणी वांगव्हॅली पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने खास महिलांसाठी मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी चेअरमन सुभाष बावडेकर, मनीषा जाधव,रजनीताई पाटील, अर्चना बच्छाव, रत्नाबाई डाकवे कार्यक्रम नियोजन समितीच्या अध्यक्ष भारती डाकवे, संस्थेची संचालक पदाधिकारी व महिला सभासद यांची उपस्थिती होती.
        त्या म्हणाल्या की, आर्थिक सुधारणांसाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे त्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक क्षेत्रात काम केले पाहिजे. महिलांचा आर्थिक विकास सुरक्षितता याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. वांगविली पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने खास महिलांसाठी आयोजित मंगळागौरी हा कार्यक्रम अत्यंत महिलांसाठी उत्साह वाढवणारा आहे त्याचबरोबर महिलांचा सहभाग वाढवणारा आहे. सुभाष बावडेकर हे संस्थेचे चेअरमन झाल्यापासून संस्थेचे प्रगतीमध्ये भर पडत आहे त्यांनी विविध संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यक्रम हाती घेतलेली आहेत. त्यांच्या अध्यक्षीय सुरुवातीला  संस्थेच्या जवळपास पंधरा कोटीची ठेवी होत्या त्या आज 35 कोटीच्या जवळपास आहेत त्याचबरोबर एनपीए चे प्रमाण सुद्धा कमी करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वांग‌ व्हॅली भवन ही त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर संस्थेचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी ही त्यांचे खूप प्रयत्न  आहेत.
 पतसंस्था फेडरेशनचा उत्कृष्ट संस्था म्हणून ही संस्थेला पुरस्कार मिळालेला आहे यातूनच त्यांच्या संस्थेची प्रगती बघायला मिळत आहे.
सुभाष बावडेकर म्हणाले की, वांग व्हॅली पतसंस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जाणार असून यातून संस्थेच्या विविध सभासदांना त्याचबरोबर ग्राहकांना याचा लाभ होईल. मंगळागौर या कार्यक्रमाचे निमित्ताने संस्थेच्या महिला सभासदांसाठी एक व्यासपीठ तयार होऊन त्यांच्या कलागुणांना व मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच त्या महिलांचा सहकार क्षेत्रामध्ये सहभाग वाढेल. येत्या काळामध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक शाखेचे ठिकाणी  कार्यक्रम आयोजित केलेली जाणार आहेत.
अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन ग्राहक वर्ग संस्थेला वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

*महाविकास आघाडीचा शनिवारी पुकारलेला कराड बंद मागे*

*महाविकास आघाडीचा शनिवारी पुकारलेला कराड बंद मागे* 

*महाविकास आघाडीचा शनिवारी पुकारलेला कराड बंद मागे*

*महाविकास आघाडीचा शनिवारी पुकारलेला कराड बंद मागे* 

 *सकाळी 10 वाजता कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे एकत्र येऊन करणार निदर्शने* 

 *न्यायालयाच्या निकालामुळे महाविकास आघाडीने घेतला निर्णय* 

(*महाविकास आघाडी, कराड तालुका* )

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

महाराष्ट्र शासनाचा लोकराज्य सामाजिक संस्था-यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई पुरस्कार प्रदान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गौरव.

महाराष्ट्र शासनाचा लोकराज्य सामाजिक संस्था-यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई पुरस्कार प्रदान 

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गौरव.

ठाणे-
महाराष्ट्र शासनाचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय यांच्या वतीने लोकराज्य या मासिकाचा प्रचार आणि प्रसार तसेच व सभासद वाढवल्याबद्दल लोकराज्य सामाजिक संस्था-यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई या संस्थेला पुरस्कार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार अध्यक्ष संजय रत्नाबाई किसन सावंत यांनी स्विकारला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उमेदच्या प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, तहसिलदार रेवण लेंभे, उमेश पाटील, राहुल सारंग, राहुल सूर्यवंशी, डॉ.संदीप थोरात, आसावरी संसारे, प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चारुलता धनके यांनी केले.

स्वातंत्र्य दिनी डोंगरमाथ्यावर शेतकर्यांचे उपोषणसलग पाचव्या दिवशी मनसेचे उपोषण कायम, मरण पत्करु पण माघार नाही...

स्वातंत्र्य दिनी डोंगरमाथ्यावर शेतकर्यांचे उपोषण

सलग पाचव्या दिवशी मनसेचे उपोषण कायम, मरण पत्करु पण माघार नाही...
पाटण/प्रतिनिधी
          सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मोरणा भागात शेतकर्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला महाउर्जा पुणे व पवनचक्की कंपनीला सोयसुतक नाही हे दुदैवी. पनामा पवनचक्की कंपनी विरोधात मनसेचे आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरुचं राहिले. 
          पाटण तालुक्यात मोरणा भागात मौजे पाचगणी याठिकाणी शेतकरी व मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांचे सोमवार दि. १२ पासून उपोषण सुरु आहे. स्वातंत्र्यदिन सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना याच देशाच्या नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागले आणि न्याय मिळवण्यासाठी लढावे लागते हे दुदैवी आहे. 
       डोंगरपठारावरती दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती शीं सामना करत राहत असलेला गोरगरीब शेतकरी वर्गाला आपल्या जीवाच्या, मुलांच्या भवितव्याचा विचार करुन बलाढ्य कंपनी शी लढताना आज किमाण स्वातंत्र्य दिनी ही स्वातंत्र्य नाही असं म्हणावे लागेल. 
     देशात भारतीय म्हणून राहत असताना जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग प्रचंड दबावाखाली वावरत आहे. पाच वर्ष पनामा पवनचक्की कंपनीच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात  महाउर्जा विभाग पुणे यांच्याशी कागदपत्री लढा देत आहे. आज १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आपापल्या कार्यालयात ध्वजारोहण करुन जिलेबी गोड धोड खाण श्रेष्ठत्व समजाणे अधिकारी वर्ग व कंपनी चे अधिकारी यांना शेतकर्यांची तिळमात्र काळजी नाही. आज दिवसभर प्रशासकीय कोणीही डोंगरमाथ्यावर फिरकले नाही च परंतु त्यांची साधी दखल घेणे ही महत्त्वाचे वाटले नाही. 
      आम्हाला या देशात न्याय मिळत नसेल तर आम्ही भारतीय म्हणून राहणे गैर आहे. आमचं भारतीयत्व काढून घ्यावं आणि आम्हाला मरायला मोकळं करा अश्या तीव्र भावना समस्त उपोषणकर्ते व शेतकरी वर्गाने मांडले.

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

सातारा - टपाल खात्यातर्फे राखी पाकिटे,वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय.

 

सातारा - टपाल खात्यातर्फे राखी पाकिटे,वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय.
 

 
 
सातारा दि.2 : राखी पाकिटांचे भारतातील सर्व ठिकाणी लवकर वितरणासाठी सातारा टपाल विभागातर्फे भेट कार्ड स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभाग डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मेल्ससाठी स्वतंत्र पत्रपेट्या, ट्रे ठेवलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध डाकघरांसाठी पुढीलप्रमाणे स्वतंत्र पत्रपेट्या ठेवल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा प्रधान डाकघर- पिनकोड नं. 415001, सातारा शहर- 415002, एमआयडीसी सातारा- 415004, संगमनगर सातारा- 415003, वाई- 412803, कोरेगांव- 415501, लोणंद- 415521, महाबळेश्वर- 412806, फलटण- 415523, पाचगणी- 412805 याप्रमाणे पिनकोड आहेत. या पोस्ट ऑफीसमध्ये सातारा शहर आणि जिल्हा, पुणे शहर, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, उर्वरीत महाराष्ट्र, उर्वरीत भारत साठी स्वंतत्र पेट्या किंवा ट्रे ठेवण्यात आल्या आहेत.
या मुख्य पोस्ट कार्यालयाव्यतिरीक्तही इतर पोस्टातही राखी पाकिटे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांची राखी पाकिटे पोस्ट कार्यालयात व्यवस्था केलेल्या पत्र पेट्या, ट्रे यामध्ये टाकावी किंवा टपाल कर्मचारी यांचेकडे द्यावीत. याबाबतीत काही अडचण असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

सातारा - जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळावर जाण्यास 5 ऑगस्टपर्यंत बंदी.

सातारा - जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळावर जाण्यास 5 ऑगस्टपर्यंत बंदी.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश.


भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 1 ते 5 ऑगस्ट 2024 अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. 

सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील- लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील - ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील- ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील- ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये. जिवीत व वित्तहानी होऊ नये या करिता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील वरील धबधबे तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये सातारा जिल्हयातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  

सदर धबधब्यांच्या ठिकाणी आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलीस विभागाने सातारा जिल्ह्यातील वरील धबधब्यांच्या/पर्यटन स्थळांच्या अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना दि.02/08/2024 ते 04/08/2024 अखेर जाणेस तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालणेत येत आहे.

ठिकाणी जाणारे मार्ग / रस्ते बंद करावेत. पोलीस विभाग व संबंधीत गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत तसेच सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याबाबत दक्षता घ्यावी. पर्यटन स्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता भासलेस नियमांचा भंग करणा-या विरुध्द आवश्यक ती कठोर कारवाई करावी. सदरकामी मोठया प्रमाणावर जाहिर प्रसिध्दी देणेत यावी. संबंधीत कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी आपले स्तरावरुन स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश पारित करुन त्याची अंमलबजावणी करावी. पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, ग्रामविकास विभाग व नगरपालिका विभागांनी संयुक्त रित्या उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करावी. असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...