सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

सुभाष बावडेकर यांच्या अध्यक्षीय काळात वांगव्हॅली को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रगतीच्या दिशेने- मेघना काकडे- मानेसहकार क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक सुभाष बावडेकर यांचे प्रतिपादन.

 सुभाष बावडेकर यांच्या अध्यक्षीय काळात वांगव्हॅली को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रगतीच्या दिशेने- मेघना काकडे- माने

सहकार क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक सुभाष बावडेकर यांचे  प्रतिपादन.



भांडुप मुंबई दि.25.08.2024   सुभाष बावडेकर यांच्या अध्यक्षीय काळात वांगव्हॅली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रगतीच्या दिशेने कामकाज करत आहे असे मत पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेघना काकडे-माने यांनी केले आहे. भांडुप या ठिकाणी वांगव्हॅली पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने खास महिलांसाठी मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी चेअरमन सुभाष बावडेकर, मनीषा जाधव,रजनीताई पाटील, अर्चना बच्छाव, रत्नाबाई डाकवे कार्यक्रम नियोजन समितीच्या अध्यक्ष भारती डाकवे, संस्थेची संचालक पदाधिकारी व महिला सभासद यांची उपस्थिती होती.
        त्या म्हणाल्या की, आर्थिक सुधारणांसाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे त्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक क्षेत्रात काम केले पाहिजे. महिलांचा आर्थिक विकास सुरक्षितता याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. वांगविली पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने खास महिलांसाठी आयोजित मंगळागौरी हा कार्यक्रम अत्यंत महिलांसाठी उत्साह वाढवणारा आहे त्याचबरोबर महिलांचा सहभाग वाढवणारा आहे. सुभाष बावडेकर हे संस्थेचे चेअरमन झाल्यापासून संस्थेचे प्रगतीमध्ये भर पडत आहे त्यांनी विविध संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यक्रम हाती घेतलेली आहेत. त्यांच्या अध्यक्षीय सुरुवातीला  संस्थेच्या जवळपास पंधरा कोटीची ठेवी होत्या त्या आज 35 कोटीच्या जवळपास आहेत त्याचबरोबर एनपीए चे प्रमाण सुद्धा कमी करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वांग‌ व्हॅली भवन ही त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर संस्थेचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी ही त्यांचे खूप प्रयत्न  आहेत.
 पतसंस्था फेडरेशनचा उत्कृष्ट संस्था म्हणून ही संस्थेला पुरस्कार मिळालेला आहे यातूनच त्यांच्या संस्थेची प्रगती बघायला मिळत आहे.
सुभाष बावडेकर म्हणाले की, वांग व्हॅली पतसंस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जाणार असून यातून संस्थेच्या विविध सभासदांना त्याचबरोबर ग्राहकांना याचा लाभ होईल. मंगळागौर या कार्यक्रमाचे निमित्ताने संस्थेच्या महिला सभासदांसाठी एक व्यासपीठ तयार होऊन त्यांच्या कलागुणांना व मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच त्या महिलांचा सहकार क्षेत्रामध्ये सहभाग वाढेल. येत्या काळामध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक शाखेचे ठिकाणी  कार्यक्रम आयोजित केलेली जाणार आहेत.
अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन ग्राहक वर्ग संस्थेला वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...