शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

सातारा - टपाल खात्यातर्फे राखी पाकिटे,वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय.

 

सातारा - टपाल खात्यातर्फे राखी पाकिटे,वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय.
 

 
 
सातारा दि.2 : राखी पाकिटांचे भारतातील सर्व ठिकाणी लवकर वितरणासाठी सातारा टपाल विभागातर्फे भेट कार्ड स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभाग डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मेल्ससाठी स्वतंत्र पत्रपेट्या, ट्रे ठेवलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध डाकघरांसाठी पुढीलप्रमाणे स्वतंत्र पत्रपेट्या ठेवल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा प्रधान डाकघर- पिनकोड नं. 415001, सातारा शहर- 415002, एमआयडीसी सातारा- 415004, संगमनगर सातारा- 415003, वाई- 412803, कोरेगांव- 415501, लोणंद- 415521, महाबळेश्वर- 412806, फलटण- 415523, पाचगणी- 412805 याप्रमाणे पिनकोड आहेत. या पोस्ट ऑफीसमध्ये सातारा शहर आणि जिल्हा, पुणे शहर, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, उर्वरीत महाराष्ट्र, उर्वरीत भारत साठी स्वंतत्र पेट्या किंवा ट्रे ठेवण्यात आल्या आहेत.
या मुख्य पोस्ट कार्यालयाव्यतिरीक्तही इतर पोस्टातही राखी पाकिटे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांची राखी पाकिटे पोस्ट कार्यालयात व्यवस्था केलेल्या पत्र पेट्या, ट्रे यामध्ये टाकावी किंवा टपाल कर्मचारी यांचेकडे द्यावीत. याबाबतीत काही अडचण असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...