बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात श्री. वाल्मीकी विद्यामंदिराने मिळविला द्वितीय क्रमांक.

 

                                                  साप्ताहिक वृत्तपत्र

कुमजाई पर्व

                                                                                                आवाज जनसामान्यांचा.......


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात श्री. वाल्मीकी विद्यामंदिराने मिळविला द्वितीय क्रमांक. 

 

तळमावले, दि. 27 : राज्यातील शैक्षणिक विभागातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निकालांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदींची तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने करण्यात आली होती.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियाना- अंतर्गत खाजगी व्यवस्थापन शाळा गटामध्ये पाटण तालुक्यातील तीन व शासकीय शाळांच्या गटातून जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. 

खाजगी व्यवस्थापन गटात पाटण येथील सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा, पाटणने प्रथम क्रमांक, तळमावले येथील श्री वाल्मीकी विद्यामंदिराने द्वितीय व चाफळ येथील श्री समर्थ विद्यामंदिराने तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय शासकीय शाळांच्या गटातून जि. प. शाळा, वेखंडवाडीने प्रथम, जि. प. शाळा, ढोरोशीने द्वितीय व जि. प. शाळा, चव्हाणवाडीने तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास असे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत घटक होते. 

या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...