तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल - डॉ.संदीप डाकवे
तळमावले/वार्ताहर
सैदापूर विद्यानगर (ता.कराड) येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयास इंडिया ऑफ रेकॉर्ड होल्डर युवा चित्रकार, पत्रकार, लेखक, डॉ.संदीप डाकवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देऊन आपला अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. याशिवाय तात्यांची स्पंदने ई बुक प्रकाशन आणि मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी ही दिली आहे. त्याप्रसंगी ते म्हणाले, ‘‘समाजातील विविध घटकांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालये प्रयत्न करत आहेत. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून ज्ञानात्मक समाज घडविण्याची जबाबदारी जशी ग्रंथालयांची आहे तशी समाजातील ज्ञानसंपन्न, विचारवंतांचीही आहे. वाचनाने समृद्ध होणारा माणूस समाजाचे प्रामाणिक नेतृत्व करुन त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहतो. समाजातील प्रत्येक घटकांनी आपला वाढदिवस ग्रंथालयाला ग्रंथ देऊन केल्यास येणाऱ्या काळात तरुण पिढी याचा आदर्श घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च होणारा पैसा योग्य मार्गी लागेल. वाचनसंस्कृती ही फक्त ग्रंथालयांची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची आहे. तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल.
स्वतःच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवण्याची आपली परंपरा डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळीही कायम ठेवली. यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आ.शंभूराज देसाई यांच्या हस्ते वहया वाटप, रु.5,000/- किमतीचे तक्ते वाटप, मनातलं पुस्तक प्रकाशन, अनाथाश्रम धान्य वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, रक्तदान, दीपस्तंभ डाॅक्युमेंटरी प्रकाशन, ग्रंथालयाला 75 पुस्तके वाटप, स्नेहबंध पुस्तक प्रकाशन असे उपक्रम राबवले आहेत.
यावेळी गयाबाई डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, सीमा कांबळे, शंकर काशीद, पुनम जाधव, अभिजित जाधव, राज जाधव, स्पंदन डाकवे, सांची डाकवे तसेच ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित होते आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.
खा.श्रीनिवास पाटील यांचेकडून दूरध्वनीवरुन शुभेच्छा
डाॅ.संदीप डाकवे यांच्या वाढदिवसानिमित्त खा.श्रीनिवास पाटील यांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. ‘‘संदीपराव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!, आपली कला दिवसेंदिवस बहरत जावो आपली चित्रे योग्य ठिकाणी प्रदर्शित व्हावी. अशी पांडूरंगचरणी शुभेच्छा.! अशा शब्दात खा.पाटील यांनी डाॅ.संदीप डाकवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा