![]() |
सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी
लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वार्षिक ६००० रु. अनुदान देण्यात येते. ही
योजना केंद्र सरकारने सन २०१९ पासून देशातील शेतक-यांसाठी सुरु केली आहे.
याच धर्तीवर नुकतीच राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली
असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नमो
शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ होत आहे.
जिल्ह्यात
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ४ लाख ६६ हजार २०० शेतक-यांनी
नोंदणी केली. याच लाभार्थीना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत लाभ देय
आहे. योजनेत नोंदणी केलेल्या शेतक-यांपैकी सुमारे ७५ हजार ६७६ शेतकरी इ
केवायसी नसल्याने आणि ७२ हजार ३२६ आधार सिडींग नसल्याने लाभापासून वंचित
होते. कृषि विभागाने गावोगोवी सभा, मेळावे आयोजीत करुन, जनजागृती करुन
सुमारे ४४ हजार १५१ शेतक-यांच्या ई- केवायसी आणि ४५ हजार ९३८ आधार सिडींगचे
पुर्ण करुन घेतले आहे. आधार सिडींगच्या कामासाठी कृषि विभागास इंडिया
पोस्ट बँक साह्य करीत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या
शेतक-यांची नावे डिलीट करण्याचे काम देखील चालू आहे.
सद्या
सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत सुमारे ८ हजार ५१०
स्वयंनोंदणीकृत शेतक-यांना योजना लाभाच्या प्रक्रियेत आणण्यासाठीचे काम
मागील ८ दिवसात पुर्ण करण्यात आले आहे. त्या बरोबर तालुका स्तरावर
मान्यतेसाठी प्रलंबित असलेल्या १४ हजार १७६ शेतकऱ्यांची देखील प्रक्रिया
पूर्ण करण्यात आली आहे. तसेच २० हजार ९१६ स्वयंनोंदणीकृत शेतकरी
लाभार्थ्यांची पुढील प्रक्रिया चालू आहे. सदर शेतकरी योजनेच्या लाभास पात्र
आहेत किंवा कसे याबाबत महसूल विभागाशी समन्वय साधून प्रक्रिया पूर्ण करुन
घेण्यात येत आहे.
गावपातळीवर
कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि
अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी जास्तीत जास्त शेतक-यांना या
योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने विकसित भारत यात्रा अंतर्गत प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेची विशेष मोहीम राबवून या योजनेचे काम प्रगतीपथावर
सुरु ठेवले आहे, व याचा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना होत आहे.
सातारा
तालुका अनुक्रमे (पुर्ण ई-केवायसी झालेले- 1607) (पुर्ण आधार सिडींग-
1114) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 870),
कोरेगांव तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 5073) (पुर्ण आधार सिडींग- 8347)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 690), खटाव
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 2043) (पुर्ण आधार सिडींग- 4111)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 854), कराड
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 5317) (पुर्ण आधार सिडींग- 5720)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 1384), पाटण
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 3231) (पुर्ण आधार सिडींग- 5577)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 860), वाई
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 1193) (पुर्ण आधार सिडींग- 1185)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 126), जावली
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 4454) (पुर्ण आधार सिडींग- 5328)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 255), खंडाळा
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 2241) (पुर्ण आधार सिडींग- 4042)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 167),
महाबळेश्वर तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 7211) (पुर्ण आधार सिडींग-
5468) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 710),
फलटण तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 5287) (पुर्ण आधार सिडींग- 3400)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 1344), माण
तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 4613) (पुर्ण आधार सिडींग- 1646)
(स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 1133).
१५ जानेवारी पर्यंत लाभ मिळत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांनी पीएम किसान ची
नोंदणी करावी, अधिक माहीतीसाठी कृषि विभागाशी संपर्क करावा,
असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा