बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 
 


 

पाटण - मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये आज 75 वा भारतीय  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी  प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे  या केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.अभिजीत डूबल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.डी.एम.शेजवळ, ग्रामसेवक श्री. पिसाळ सो,  तसेच सोनवडे, सुळेवाडी, हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोनवडे  विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस  चेअरमन, सर्व सदस्य, आजी - माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. 

 यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाच्या  प्रगतीचा आलेख, व विविध उपक्रमांची माहिती दिली , तसेच त्यांनी मोरणा शिक्षण संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार वरीष्ठ शिक्षक श्री.संजय डोंगरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोयना अभयारण्यग्रस्त वेळे व मळे गावच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास केंद्र शासनाची अंतिम मान्यता 35 वर्षापासून रखडलेला प्रश्न अखेर सुटला पुनर्वसित गावांना सर्व नागरी सुविधा देणार - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी


                                                                            



 

सातारा दि.31 : महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन अधिसुचना क्रमांक उब्नुएलपी - 1085 / सीआर/ 588 (१) एफ-5 दिनांक 16 सप्टेंबर अन्वये कोयना अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. संरक्षित क्षेत्रातील गावांचा विकास व वन्यजीव संवर्धनाचा सुवर्णमध्य गाठण्यासाठी संरक्षित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन आवश्यक आहे.

सातारा जिल्हयामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमध्ये एकुण 52 गावांचे क्षेत्र समाविष्ठ आहे. त्यापैकी 19 गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे पुर्वीच पुनर्वसित झालेली आहेत. तसेच 18 गावांचे अभयारण्यातील हक्क कायम केलेले आहेत. उर्वरित 15 गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर करावयाचे आहे. त्यापैकी 10 गावांची पुनर्वसन झाले असुन 5 गावांचे पुनर्वसन प्रक्रिया सुरु आहे.
ज्यामध्ये मौजे वेळे ता.जावली या गावाचा समावेश आहे. सदर गावामध्ये एकुण 135 प्रकल्पग्रस्त असुन त्यापैकी 61 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खंडाळा मधील 112.25 हे. आर वनक्षेत्रावर करण्यात येत आहे. सदर खातेदारांचे पुनर्वसन करणेकामी 112.25 हे. आर वनक्षेत्र निर्वणीकरणाचा प्रस्ताव दिनांक 7 जुलै 2021 रोजी वनविभाग सातारा यांनी केंद्र शासनास सादर केला होता.
तसेच मौजे मळे ता. पाटण या गावाचा समावेश असुन सदर गावामध्ये एकुण 140 प्रकल्पग्रस्त असुन त्यापैकी 20 प्रकल्पग्रस्तांनी पर्याय 1 चा स्वीकार केला आहे व 120 खातेदारांनी पर्याय 2 चा स्वीकार केला आहे.
मौजे मळे गावातील 120 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील पाटण व कराड तालुक्यामध्ये करण्यात येत आहे, याकामी कराड व पाटण तालुक्यातील 227.9 हे. आर वनक्षेत्र निर्वणीकरणाचा प्रस्ताव दिनांक 7 जून 2021 रोजी वनविभाग सातारा यांनी केंद्र शासनास सादर केला होता.
अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाचा 35 वर्ष पासुन प्रलंबीत प्रश्नाची गांर्भीयाने दखल घेवून  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज यांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सातारा व उपवनसंरक्षक कार्यालय सातारा यांचे उत्तम समन्वयामुळे वरील दोन्ही प्रस्तावास दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी केंद्र शासनाकडून अंतीम मान्यता प्राप्त झाली आहे.
मौजे वेळे व मळे गावचे पुनर्वसनकामी निर्वणीकरण करण्यात आलेल्या क्षेत्रावर सदर गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर केले जाईल, याकामी अभिन्यास आराखडा तयार करुन सदर गावास महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अन्वये 18 नागरी सुविधा पुरविण्यात येतील.

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

*कलाकृती साकारत स्व. रजनीताई श्रीनिवास पाटील यांना आदरांजली.*


*कलाकृती साकारत स्व. रजनीताई श्रीनिवास पाटील यांना आदरांजली.*
खा. श्रीनिवास पाटील यांच्या सुविद्य पत्नी स्व. रजनीताई श्रीनिवास पाटील उर्फ माई यांचे स्केच साकारत त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी. पेनाने रेखाटलेले माईंचे चित्र लक्षवेधी ठरत आहे.

*पृथ्वीराज चव्हाण यांच्या दूरदृष्टीने साकारला गेला समुद्रावरील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक**ज्याचे मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन*

*पृथ्वीराज चव्हाण यांच्या दूरदृष्टीने साकारला गेला समुद्रावरील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक*

*ज्याचे मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन* 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चे उदघाट्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. उदघाट्न होतंय हे चांगली बाब आहे. पण हि दूरदृष्टी कोणाची होती याचा विसर आत्ताच्या आभासी दुनियेतील जनतेला पडलेला दिसतो.

*मुंबईचे वाढते ट्राफिक यामधून पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेस वे ला जलद पोहचण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मुंबई मधून बाहेर पडणारा फ्री वे व त्यालाच जोडणारा हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे दोन्ही पूल उभारण्याची संकल्पना होती ती तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची. या दोन पूल मधील 'फ्री वे' पूल पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाला पण समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंक या पुलाच्या कामाला पूर्ण होण्यास वेळ लागला व तो पूल आता सत्यात उतरतोय आणि त्याचे उदघाट्न पंतप्रधानांच्या हस्ते झालं आहे.* 

*2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने हा पूल उभारण्याच्या सर्व मंजुरी पूर्ण करून प्रस्ताव केंद्र सरकारकडे निधीच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला 2013 साली निधीची मंजुरी तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली व निधीची तरतूद सुद्धा झाली.*

त्यानंतर फडणवीस सरकार व उद्धव ठाकरे सरकारच्या काळात या पूल उभारणीला गती मिळाली व आता या पुलाचे लोकार्पण होत आहे.

*मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रोजेक्ट असो किंवा मुंबईतील मोनोरेल प्रोजेक्ट असो असे अनेक मोठ्या शहराच्या दृष्टीने महत्वाचे असणारे प्रोजेक्ट मंजुरीचे काम व ते सत्यात उतरविण्यासाठीची कल्पना आणि डीझाईन हे सर्व काँग्रेसच्या काळातच झाले होते.* ती कामे इतकी दूरदृष्टीची होती कि त्या प्रोजेक्ट चे उद्घाटन अजूनही भाजप सरकार करत आहेत पण कामे काही संपलेली नाहीत. साधा विषय आहे ज्या प्रोजेक्टला मंजुरी मिळालीत व निधीची तरतूद झाली आहे ते प्रोजेक्ट थांबवता येत नाहीत ते पूर्ण होतातच पण त्यांचे उदघाट्न कोणाच्या काळात होतंय म्हणून आधीच्या दूरदृष्टी असणाऱ्या सरकारचे धोरण वाया जात नाही. 

पण आता केवळ गोदी मीडिया नव्हे तर ट्रॅव्हल ब्लॉग किंवा vlog करणारे युट्युबरं लोकही याला ऑन कॅमेरा मोदीजी की व्हिजन, मोदीजींका सपना, मोदीजी के काल मे हुआ विकास वगैरे म्हणत आहेत... हा सगळा सोशल मीडिया आणि व्हॉटसअप विद्यापीठ टाईप उथळपणा आहे... काहीच सखोल माहिती, इतिहासात काय झाले वगैरे माहिती नसताना काहीही ऑन कॅमेरा ठोकून द्यायचे अशी परिस्थिती आहे.

बुधवार, १० जानेवारी, २०२४

तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल - डॉ.संदीप डाकवे


 तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल - डॉ.संदीप डाकवे


तळमावले/वार्ताहर
सैदापूर विद्यानगर (ता.कराड) येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयास इंडिया ऑफ रेकॉर्ड होल्डर युवा चित्रकार, पत्रकार, लेखक, डॉ.संदीप डाकवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देऊन आपला अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. याशिवाय तात्यांची स्पंदने ई बुक प्रकाशन आणि मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी ही दिली आहे. त्याप्रसंगी ते म्हणाले, ‘‘समाजातील विविध घटकांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालये प्रयत्न करत आहेत. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून ज्ञानात्मक समाज घडविण्याची जबाबदारी जशी ग्रंथालयांची आहे तशी समाजातील ज्ञानसंपन्न, विचारवंतांचीही आहे. वाचनाने समृद्ध होणारा माणूस समाजाचे प्रामाणिक नेतृत्व करुन त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहतो. समाजातील प्रत्येक घटकांनी आपला वाढदिवस ग्रंथालयाला ग्रंथ देऊन केल्यास येणाऱ्या काळात तरुण पिढी याचा आदर्श घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च होणारा पैसा योग्य मार्गी लागेल. वाचनसंस्कृती ही फक्त ग्रंथालयांची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची आहे. तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल.
स्वतःच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवण्याची आपली परंपरा डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळीही कायम ठेवली. यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आ.शंभूराज देसाई यांच्या हस्ते वहया वाटप, रु.5,000/- किमतीचे तक्ते वाटप, मनातलं पुस्तक प्रकाशन, अनाथाश्रम धान्य वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, रक्तदान, दीपस्तंभ डाॅक्युमेंटरी प्रकाशन, ग्रंथालयाला 75 पुस्तके वाटप, स्नेहबंध पुस्तक प्रकाशन असे उपक्रम राबवले आहेत.       
         यावेळी गयाबाई डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, सीमा कांबळे, शंकर काशीद, पुनम जाधव, अभिजित जाधव, राज जाधव, स्पंदन डाकवे, सांची डाकवे  तसेच ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित होते आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.


 खा.श्रीनिवास पाटील यांचेकडून दूरध्वनीवरुन शुभेच्छा


    डाॅ.संदीप डाकवे यांच्या वाढदिवसानिमित्त खा.श्रीनिवास पाटील यांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. ‘‘संदीपराव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!, आपली कला दिवसेंदिवस बहरत जावो आपली चित्रे योग्य ठिकाणी प्रदर्शित व्हावी. अशी पांडूरंगचरणी शुभेच्छा.! अशा शब्दात खा.पाटील यांनी डाॅ.संदीप डाकवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

*सातारा - पी एम किसान अंतर्गत हजारो शेतक-यांची ई-केवायसी पूर्ण* *पात्र लाभार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन*

 


 
Big news on PM Kisan scheme big decision of government do not give wrong  information dsmp | PM Kisan Yojana: पीएम किसान योजना पर बड़ी खबर, अब 1  जनवरी को किसानों के

  सातारा  :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वार्षिक ६००० रु. अनुदान देण्यात येते. ही योजना केंद्र सरकारने सन २०१९ पासून देशातील शेतक-यांसाठी सुरु केली आहे. याच धर्तीवर नुकतीच राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ होत आहे.
  जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ४ लाख ६६ हजार २०० शेतक-यांनी नोंदणी केली. याच लाभार्थीना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत लाभ देय आहे. योजनेत नोंदणी केलेल्या शेतक-यांपैकी सुमारे ७५ हजार ६७६ शेतकरी इ केवायसी नसल्याने आणि ७२ हजार ३२६ आधार सिडींग नसल्याने लाभापासून वंचित होते. कृषि विभागाने गावोगोवी सभा, मेळावे आयोजीत करुन, जनजागृती करुन सुमारे ४४ हजार १५१ शेतक-यांच्या ई- केवायसी आणि ४५ हजार ९३८ आधार सिडींगचे पुर्ण करुन घेतले आहे. आधार सिडींगच्या कामासाठी कृषि विभागास इंडिया पोस्ट बँक साह्य करीत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या शेतक-यांची नावे डिलीट करण्याचे काम देखील चालू आहे.
  सद्या सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत सुमारे ८ हजार ५१० स्वयंनोंदणीकृत शेतक-यांना योजना लाभाच्या प्रक्रियेत आणण्यासाठीचे काम मागील ८ दिवसात पुर्ण करण्यात आले आहे. त्या बरोबर तालुका स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित असलेल्या १४ हजार १७६ शेतकऱ्यांची देखील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच २० हजार ९१६ स्वयंनोंदणीकृत शेतकरी लाभार्थ्यांची पुढील प्रक्रिया चालू आहे. सदर शेतकरी योजनेच्या लाभास पात्र आहेत किंवा कसे याबाबत महसूल विभागाशी समन्वय साधून प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यात येत आहे.
  गावपातळीवर कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी जास्तीत जास्त शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने विकसित भारत यात्रा अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची विशेष मोहीम राबवून या योजनेचे काम प्रगतीपथावर सुरु ठेवले आहे, व याचा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना होत आहे. 
  सातारा तालुका अनुक्रमे (पुर्ण ई-केवायसी झालेले- 1607) (पुर्ण आधार सिडींग- 1114) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 870), कोरेगांव तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 5073) (पुर्ण आधार सिडींग- 8347) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 690), खटाव तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 2043) (पुर्ण आधार सिडींग- 4111) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 854), कराड तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 5317) (पुर्ण आधार सिडींग- 5720) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 1384), पाटण तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 3231) (पुर्ण आधार सिडींग- 5577) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 860), वाई तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 1193) (पुर्ण आधार सिडींग- 1185) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 126), जावली तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 4454) (पुर्ण आधार सिडींग- 5328) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 255), खंडाळा तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 2241) (पुर्ण आधार सिडींग- 4042) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 167), महाबळेश्वर तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 7211) (पुर्ण आधार सिडींग- 5468) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 710), फलटण तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 5287) (पुर्ण आधार सिडींग- 3400) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 1344), माण तालुका (पुर्ण ई-केवायसी झालेले- 4613) (पुर्ण आधार सिडींग- 1646) (स्वयंनोंदणीकृत शेतकरी यांना पीएम किसान अंतर्गत मान्यता- 1133). 
  १५ जानेवारी पर्यंत लाभ मिळत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांनी पीएम किसान ची नोंदणी करावी, अधिक माहीतीसाठी कृषि विभागाशी संपर्क करावा, 
 असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे  यांनी केले आहे. .

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

पाटण तालुक्यातील दिव्यांगांना चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप व किशोरवयीन मुली व महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे ही उद्घाटन.

 




                  पाटण (०८ जानेवारी २०२४) :  पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली केंद्र  व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पाटण पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, तसेच तालुक्यातील किशोरवयीन मुली आणि महिला भगिनींसाठी आरोग्य, तंत्रज्ञान आणि कायदेविषयक बाबींचे प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, यादृष्टीने कायम सहकार्य राहील, असे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांनी केले. पाटण पंचायत समितीच्या वतीने आयोजित आणि दिव्यांगांना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप आणि महिला प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मा. यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.    

लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण यांच्यावतीने सुस्वाद हॉल  म्हावशी पेठ पाटण येथे दिव्यांगांना साहाय्यक साहित्य वाटप तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती  पाटणचे गट विकास अधिकारी श्री.गोरख शेलार, बाजार समिती सदस्य दादासो जाधव, नाना पवार, माजी जि.प. सदस्य बशीर खोंदू,  गणीभाई चाफेरकर, सलीमभाई इनामदार,इरफान सातारकर यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते,पंचायत समितीचे अधिकारी तसेच विद्यार्थीनी, महिला व दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांना रोजच्या वापरात येणारे व्हीलचेअर, बॅटरी सायकल, तीन चाकी सायकल हँड पॉप्रिलेड, स्मार्ट फोन, इलेक्ट्रिकल काठी व इतर साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिव्यांग बांधवासाठी  मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरु केल्याने दिव्यांग बांधवाना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.  आज दिव्यांग बांधवाना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील सुमारे ५५ लाख रुपयांचे हे साहित्याचा लाभ 770 बांधवाना होणार आहे. 

 

यावेळी  किशोरवयीन मुली व महिलांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संबोधित करताना मा. यशराजदादा देसाई म्हणाले की, या कार्यशाळेतून किशोरवयीन मुलींना व महिलांना पोषण, आरोग्य, कुटुंबनियोजन व कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. माता-भगिनींना  या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होईल. तसेच यापुढेही महिला वर्गासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाईल. आज स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. भविष्यात लोकसभेत व विधानसभेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळू शकते त्यामुळे    किशोरवयीन मुलींना व महिलांना कायद्याने दिलेले हक्क याची माहिती असणे आवश्यक आहे. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शानाखाली दिव्यांग व महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रमाचे माध्यमातून आवश्यक ते सहकार्य कायम करू, ते शेवठी बोलताना म्हणाले.


सोमवार, ८ जानेवारी, २०२४

सौ.वनिता शामराव पवार यांचे दुःखद निधन.

 

 

                                                                     निधन वार्ता


 


शेंडेवाडी गावचे पोलीस पाटील श्री.संतोष शामराव पवार सर यांच्या मातोश्री  सौ.वनिता शामराव पवार यांचे काल रविवार दि.7 जानेवारी रोजी वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले

.
रक्षा विसर्जन बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी  वैकुंठधाम शेंडेवाडी येथे सकाळी 09:30 वाजता होणार आहे.

 सौ.वनिता शामराव पवार खूप मनमिळावू स्वभावाच्या होत्या  गावात त्या काकू या नावाने परिचित होत्या त्यांच्या मागे पती मुले, मुली, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

स्वच्छ आणि पारदर्शक पत्रकारीतेची समाजाला गरज -पोलीस अधीक्षक समीर शेख


                                                                       



 
                सातारा दि.6  : सध्याची पत्रकारिता अनेक संक्रमणातून जात आहे.साताऱ्यातील पत्रकारिता देशाला व राज्याला दिशा दर्शक आहे. पत्रकारांनी कोणत्याही प्रकारच्या दबावांना, अमिषांना बळी न पडता पत्रकारितेमध्ये पारदर्शकता आणि स्वच्छ स्वरुप आणणे आवश्यक असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केले.

 जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन पत्रकार दिन येथील  कृषी विभागाच्या बळीराजा सभागृहात साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 कार्यक्रमाला पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार दीपक शिंदे, राहूल तपासे, सुजीत आंबेकर, सनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.   यावेळी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, अलीकडच्या काळात शोध पत्रकारिता वाढण्याची आवश्यकता आहे. कोणतेही काम करताना त्याला सत्यशोधनाचा आधार मिळाला तर अधिक आनंद देणारे असते. पण, हे करत असताना अनेक अडचणी येत असतात. दबाव येत असतात. त्याला बळी न पडता पत्रकारांना त्यांचे काम करता आले पाहिजे, यासाठी तशा पध्दतीचे वातावरण तयार झाले पाहिजे. पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता आली असली तरी सर्वांची स्थिती एकसारखी नाही. त्यामुळे नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची व्यवस्थाही या पत्रकारितेमध्ये असली पाहिजे. पत्रकारीतेमध्ये गती, सत्यता आणि विश्वासाहार्यता महत्वाची असते. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांना प्रशिक्षणाची गरज असते त्यांच्यासाठी संघटनेने नवीन कोर्सेस सुरु केले तर पोलीसांमार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.सोशल मीडिया चा चुकीचा वापर केला गेला तर गंभीर प्रकार होतात.त्यावर आळा बसणे आवश्यक आहे. अफवा पसरवणे हा गुन्हा असून अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल.साताऱ्यातील पत्रकारीतेला दर्जा असल्याने सोशल माध्यमांबाबत एक एसओपी तयार करावी लागणार असून त्याबाबत  जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, विभागीय समितीचा अध्यक्ष म्हणून अधिक सकारात्मक राहून जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याबरोबर ही प्रक्रिया सोपी व्हावी आणि पत्रकार कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. बाळाशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभही जिल्ह्यातील पत्रकरांना मिळवून देण्याचा प्रयत्न पुढील तीन वर्षांच्या काळात विशेषत्वाने केला जाईल.

सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे समज पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. साताऱ्यातील पत्रकारितेला मोठा इतिहास असून त्याप्रमाणे चांगली वाटचाल सुरु आहे.

यावेळी पत्रकार सनी शिंदे, सुजीत आंबेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. दीपक शिंदे यांनी सुत्रसंचालन तर जयंत लंगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, दत्ता मर्ढेकर, अजित जगताप, केशव चव्हाण, अरुण जावळे, वैभव जाधव, विष्णू शिंदे यांच्यासह प्रिंट, इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते

सोमवार, १ जानेवारी, २०२४

तात्यांची स्पंदने’ ई-बुक ला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा.

 तात्यांची स्पंदने’ ई-बुक ला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा






तळमावले/वार्ताहर
   ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी शुभेच्छा देवून पुस्तकाच्या अभिप्रायाचे ई-बुक या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले आहे. या ई-बुक चे प्रकाशन मंगळवार दि.9 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधत ‘तात्या’ हे पुस्तक लिहून वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आलेल्या अभिप्रायाचे ई-बुक करण्याचा संकल्प लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केला. या ई-बुकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा संदेश देवून या पुस्तकाचा एकप्रकारे गौरवच केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘‘डाॅ.संदीप डाकवे ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुकचे प्रकाशन करत असल्याचे समजून आनंद झाला.
‘तात्या’ या पुस्तकासंदर्भातील वाचकांचे लेखी अभिप्राय ‘तात्यांची स्पंदने’ या ई बुकमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. अभिप्रायाचे ई-बुक हा साहित्य क्षेत्रातील वेगळा उपक्रम आहे. यामुळे वाचकांना सहज अभिप्राय देणे शक्य होईल. ‘तात्या’ हे पुस्तक उपेक्षित शेतकरी वर्गाचं नेतृत्व करणारे तसेच आहे त्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकताना आपल्या मुलांना एक मार्गदर्शक बनून त्याला उत्तम ‘माणूस’ म्हणून घडवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या एका बापाची कहाणी आहे.
    ‘तात्या’ पुस्तकाला राज्यस्तरीय ‘स्वदेशी भारत सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला. ही प्रशंसनीय बाब आहे. ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुकच्या प्रकाशनास मनःपूर्वक शुभेच्छा..!
मान्यवरांच्या शुभसंदेशाबरोबरच ग्रामीण कथाकार शिवाजी मस्कर, पत्रकार सुनील शेडगे, प्रकाश सकुंडे, सौ.सीमा देसाई, संपादक भिमराव धुळप, अरुणा शेवाळे, प्रा.नंदकुमार शेडगे, ग्रामीण कथाकार सत्यवान मंडलिक, आनंदा ननावरे, विजयकुमार भंडारे, सुनील पवार, डाॅ.स्वाती अनिल मोरे, प्रा.पी.आर.सावंत, शीघ्रकवी विशाल डाकवे, यशोमती देसाई, संदिप वंडूस्कर, डाॅ.राजेंद्र कंटक, दीक्षित डी.एस., अंकुश सावंत, निलेश मोहिते, ज्येष्ठ पत्रकार आनंदराव पवार, मारुती ढगे अशा तब्ब्ल 23 मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देवून ‘तात्या’ या पुस्तकाला खऱ्या अर्थाने गौरवांकित केले आहे. या सर्वांच्या प्रतिक्रियांची सुंदर मांडणी ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक मध्ये केली असून त्यांचे पुर्ण नाव, पत्ता आणि फोटोही छापण्यात आले आहेत. 11 शुभसंदेश आणि 23 प्रतिक्रियांनी नटलेले 60 पानांचे हे ई-बुक प्रत्येकाने वाचायलाच हवे. या ई-बुकचे आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील रंगीत पानांची मांडणी सुप्रसिध्द कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे. पुस्तकाच्या आतील पानांवर परडयात झालेल्या अनोख्या पुस्तक लोकार्पणाचा फोटो, पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराचा फोटो आणि पुस्तकासंबंधी प्रकाशित झालेल्या बातम्यांची सुंदर रचना केली आहे.
    डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘तात्या’ पुस्तकाच्या अभिप्रायाचे ‘तात्यांची स्पंदने’ हे ई-बुक तयार करुन साहित्य क्षेत्रात अभिनव संकल्पना सुरु केली असून त्याचे साहित्यिकांकडून कौतुक होत आहे.

 मान्यवरांचे शुभसंदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभसंदेशासोबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.जयंत पाटील, आ.प्रा.वर्षा गायकवाड, सुप्रसिध्द साहित्यिक व व्याख्याते डाॅ.यशवंत पाटणे, संपादक चंद्रकांत चव्हाण, ज्योतिषाचार्य आबासाो दिंडे, नगरपालिका नगरवाचनालय कराड, सह्याद्री मोफत वाचनालय मल्हारपेठ, युवा साहित्य समाज वाचनालय मालदन इत्यादी मान्यवरांचे शुभसंदेश यात आहेत.


*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...