गुरुवार, २९ जून, २०२३

डॉ. शोभा चाळके म्हमाने सेट परीक्षा उत्तीर्ण

                                                  डॉ. शोभा चाळके म्हमाने सेट परीक्षा उत्तीर्ण
 
कोल्हापूर(दि.29):- संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका, प्रागतिक लेखक संघाच्या राज्य सचिव सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका डॉ. शोभा चाळके- म्हमाणे या 2023 या वर्षीच्या इंग्रजी विषयात महाराष्ट्र शासनाच्या पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या सध्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इंग्रजी विभागात कार्यरत आहेत.

त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. शिर्के, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, प्रा. किसनराव कुराडे यांच्यासह डॉ. अमर कांबळे, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. एम. आर. वैराट, डॉ. तृप्ती करिकट्टी, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बार्वेकर, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. सुरेंद्र उपरे, प्रा. सविता घाटगे, डॉ. जयंत कार्तिक यांचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक कार्यात कृतिशील असणाऱ्या डॉ. शोभा चाळके- म्हमाणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...