बुधवार, २८ जून, २०२३

पाटण - कृषि औजार मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

कृषि औजार मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

सातारा, दि. 28,  – पंचायत समिती पाटणच्या माध्मयातून जिल्हा परिषद सेसमधून खरीप हंगामासाठी बियाणे तसेच विविध कृषि यांत्रिकीकरण, आयुधे, औजारे इत्यादीसाठी पात्र व गरजु शेतकऱ्यांकडून दि. 31 जुलै 2023 रोजी पर्यंयत विहित नमुन्यातील मागणी अर्ज मागवण्यात येत असल्याचे पाटणचे गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी कळवले आहे. 

 

            पात्र लाभार्थ्यांनी अर्जासोबत 8 अ चा उतारा, साता-बारा उतारा, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, बँक पासबूकची झेरॉक्स, सिंचन सुविधेसाठी विहीर पड सातबारा, शेती पंप वीज कनेक्शनचा पुरावा, ट्रॅक्टरचलित औजारांसाठी आरसीटीसी छायाप्रत, मध पेट्या अनुदानासाठी खादी ग्रामोद्योगकडील अटी शर्ती पुर्तता करणे आवश्यक आहे. गटासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास अर्जदारांची लॉटरी काढून प्राथमिक क्रमांकानुसार निवड केली जाणार आहे. 

 

            गरजू व पात्र शेतकऱ्यांना ताडपत्री 30 स्क्वे.मी., ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह सायलक कोळपे, 5 किंवा 7.5 एचपी ओपनवेल विद्युत पंप, 4/5 एचपी डिझेल इंजिन, एचडीपीई किंवा पिव्हीसी पाईप नग 30, ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, कृषि यांत्रिकीकरण (पल्टी नांगर, पाचटकुट्टी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ.) तसेच मधपेट्यासाठी व सुधारीत संकरीत बियाणांबरोबरच औजारांसाठी 40 टक्के पासून 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पंकज हलकंदर, रमेश आहेर व सर्जेराव पाटील, विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. शेलार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...