कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 6 मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी
सातारा , दि. 28 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 21 एप्रिल 2023 रोजीच्या मध्यरात्री 0.00 पासून ते दि. 6 मे 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केला आहे.
या आदेशानुसार नागरिकां
शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करण्याच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केल्यावरुन अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्यक आहे. ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकरी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना लाठी किंवा काठी वापरण्यास परवानगी दिली असेल अशी व्यक्ती. सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्यास लागू होणार नाही.
ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा