सधन कुक्कुट विकास गट स्थापनेसाठी फक्त कराड तालुक्यातील
इच्छुक लाभार्थींनी दि. 27 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
सातारा दि. 19 : परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये फक्त कराड तालुक्यातील इच्छुक लाभार्थींनी दि. 27 एप्रिल 2023 पर्यंत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कराड येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत एकूण प्रकल्प किंमत रु. 10 लाख 27 हजार 500 असून सर्व प्रवर्गातील लाभार्थींना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थींने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारावयाचा आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी यांची वयोमार्यादा 18 ते 60 वर्ष राहील.
या योजनेसाठी करावयाचा अर्ज नमूना, जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ. परिहार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा