तळमावले/वार्ताहर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होत. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले या गावी झाला. त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 4 पुरस्कार पटकावलेले पत्रकार डाॅ.संदीप डाकवे हे कलेच्या माध्यमातून दर्पणकारांना प्रतिवर्षी अनोखे अभिवादन करतात. यावर्षी त्यांनी दैनिके आणि वृत्तवाहिनींच्या नावांमध्ये अप्रतिम चित्र रेखाटत जांभेकरांना अभिवादन केले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, व्यसनमुक्ती, जटानिर्मुलन, लेक वाचवा, स्वच्छ भारत अभियान, बचत गट अशा प्रकारच्या विषयातून जनजागृती व समाजप्रबोधन करण्यासाठी संदीपने आपली लेखणी समर्थपणे चालवली आहे. पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेले चित्र परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. एका पत्रकाराकडून दर्पणकारांना दिलेली ही अनोखी आदरांजलीच म्हणावी लागेल.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने तीनदा, वल्र्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड मध्ये दोनदा, तर द ग्रेट इंडियन रेकाॅर्ड आणि हायरेेंज वल्र्ड बुक ऑफ रेकाॅर्ड ने एकदा घेतली आहे. डाॅ.डाकवे यांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे डाकेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
रांगोळी, पोट्रेट पेंटींग, वाॅल पेंटींग, व्यंगचित्रे, पेपर कटींग आर्ट, अक्षरगणेशा अशा चित्रकलेच्या विविध माध्यमात काम करत असताना डाॅ.संदीप डाकवे यांनी शब्दातून चित्रे ही कला आत्मसात केली आहे. त्या माध्यमातून ते पोट्रेट साकारण्याचा प्रयत्न करत आहेत.
डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सेलिब्रिटी इ.क्षेत्रातील सुमारे 14 हजार पेक्षा जास्त मान्यवरांना चित्रे तयार करुन त्यांना भेट दिली आहेत. सातत्याने वेगळेपण जपत समाजप्रबोधन, जनजागृती यासाठी संदीप यांनी आपल्या कलेचा उपयोग केला आहे. विविध मंडळे, सामाजिक संस्थांनी डाॅ.डाकवे यांना ‘दर्पण’, ‘पत्रकार भूषण’, ‘पत्रकार रत्न’,‘कलारत्न’, ‘कलाविभूषण’, ‘कलागौरव’, ‘पाटण भूशण’ अशा सुमारे 60 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे
चौकटीत : प्रतिवर्षी जाभेंकरांना अनोखे अभिवादन :
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी स्क्रिबलिंग, पेपर कटींग आर्ट, शब्द-लेखणीव्दारे, पोस्टर रेखाटून, रांगोळी इ.माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची सुंदर चित्रे रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा