पाटण येथे राष्ट्रवादीचा भव्य सत्कार सोहळा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पाटण प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व विविध सहकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर, खा.श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर (संचालक, सातारा जिल्हा मध्य. सह. बॅक) यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ जानेवारी २०२३ रोजी ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे ठिक दु. १२:३० वा. संपन्न होणार आहे, अशी माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले, या सत्कार सोहळ्यामध्ये आम्हीं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांचेही सत्कार करणार आहे. हे उमेदवार जरी पराभूत झाले असले तरीही त्यांनी एका प्रचंड धनशक्ती विरुद्ध लढा देऊन तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. राजकारणात हार-जित होत असते. देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) यांची शिकवण आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले तरच पक्ष वाढतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील, माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व खा.श्रीनिवास पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
या सत्कार सोहळ्यास सर्व संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक,आजी-माजी जि.प./ पं.स.सदस्य, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा