शनिवार, १४ जानेवारी, २०२३

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे - ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे  - ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे
तळमावले/वार्ताहर
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी असे प्रतिपादन ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे यांनी केले ते महंत आबानंदगिरी चारिटेबल ट्रस्ट संचलित महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे श्रद्धास्थान महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, डॉ. संदीप डाकवे, निशा लोहार, लक्ष्मण पवार, सोनाली पवार, सुनील धुमाळ, शंकरभाऊ पवार, सारिका गुठाळे, ट्रस्ट चे संस्थापक राजेंद्र पांचाळ, वसतिगृहाच्या अधीक्षक कविता पांचाळ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कविता पांचाळ, केंदप्रमुख अरविंद दळवी, निशा लोहार, डॉ. संदीप डाकवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना आबानंदगिरीजी महाराज म्हणाले, आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. ज्या विद्यार्थ्यांना बक्षीसे मिळाली आहेत त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांनी निराश न होता पुढच्या वर्षी हे बक्षीस मला कसे मिळेल अशा विचाराने तयारीला लागले पाहिजे. 
दरम्यान, वर्षभरात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी, दीपप्रज्वन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुलींनी स्वागत गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जयवंत तरडे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कांबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवळी मॅडम, जितेंद्र पिसाळ, महाले सर, सुरवसे सर, कर्मचारी संदीप भिसे, सदाशिव गुठाळे यांनी विशेष परिश्रम केले.

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

कै.आनंदा बाबुराव मोहिते यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचे आयोजन

कै.आनंदा बाबुराव मोहिते यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचे आयोजन

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील पाटीलवाडी (कुंभारगाव) येथील आनंदा बाबुराव मोहिते यांचे तृतीय पुण्यस्मरण बुधवार दि.11 जानेवारी, 2023 रोजी येत आहे. त्यास्मृतीप्रित्यर्थ बुधवार दि.11 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शिरोली बु.ता.जुन्नर जि.पुणे येथील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.डाॅ.गजानन महाराज काळे यांच्या कीर्तनाचे आयोजन केले असल्याची माहिती मोहितेे परिवाराने दिली आहे. यासाठी ह.भ.प.धर्माचार्य अॅड.शंकर महाराज शेवाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
गजानन महाराज यांनी कुलस्वामी खंडेराय चरित्र कथा या प्रबंधासाठी डाॅक्टरेट मिळाली आहे. कार्तीकी एकादशीनिमित्त सहयाद्री वाहिनीवर, जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर 'झी टाॅकीज' या वाहिनीवर ह.भ.प.गजानन महाराज यांनी अनेक कीर्तने केली आहे. तर श्री कुलस्वामी खंडेराय यांच्यावर आठ दिवस झी टाॅकीज वर चरित्र कथा सांगितल्या आहेत. वरची पाटीलवाडी (कुंभारगांव) ता.पाटण, जि.सातारा येथे  आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उज्ज्वला मोहिते, गिरीष मोहिते, मैत्री प्रतिष्ठान कुर्ला चे अध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे उपशाखाप्रमुख सुनील मोहिते आणि समस्त मोहिते परिवार व सर्व ग्रामस्थ पाटीलवाडी कुंभारगांव यांनी केले आहे.

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

दैनिके आणि वृत्तवाहिनींच्या नावांमध्ये साकारली दर्पणकारांची कलाकृती

दैनिके आणि वृत्तवाहिनींच्या नावांमध्ये साकारली दर्पणकारांची कलाकृती

तळमावले/वार्ताहर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होत. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले या गावी झाला. त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 4 पुरस्कार पटकावलेले पत्रकार डाॅ.संदीप डाकवे हे कलेच्या माध्यमातून दर्पणकारांना प्रतिवर्षी अनोखे अभिवादन करतात. यावर्षी त्यांनी दैनिके आणि वृत्तवाहिनींच्या नावांमध्ये अप्रतिम चित्र रेखाटत जांभेकरांना अभिवादन केले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, व्यसनमुक्ती, जटानिर्मुलन, लेक वाचवा, स्वच्छ भारत अभियान, बचत गट अशा प्रकारच्या विषयातून जनजागृती व समाजप्रबोधन करण्यासाठी संदीपने आपली लेखणी समर्थपणे चालवली आहे. पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेले चित्र परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. एका पत्रकाराकडून दर्पणकारांना दिलेली ही अनोखी आदरांजलीच म्हणावी लागेल.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने तीनदा, वल्र्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड मध्ये दोनदा, तर द ग्रेट इंडियन रेकाॅर्ड आणि हायरेेंज वल्र्ड बुक ऑफ रेकाॅर्ड ने एकदा घेतली आहे. डाॅ.डाकवे यांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे डाकेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
रांगोळी, पोट्रेट पेंटींग, वाॅल पेंटींग, व्यंगचित्रे, पेपर कटींग आर्ट, अक्षरगणेशा अशा चित्रकलेच्या विविध माध्यमात काम करत असताना डाॅ.संदीप डाकवे यांनी शब्दातून चित्रे ही कला आत्मसात केली आहे. त्या माध्यमातून ते पोट्रेट साकारण्याचा प्रयत्न करत आहेत.
डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सेलिब्रिटी इ.क्षेत्रातील सुमारे 14 हजार पेक्षा जास्त मान्यवरांना चित्रे तयार करुन त्यांना भेट दिली आहेत. सातत्याने वेगळेपण जपत समाजप्रबोधन, जनजागृती यासाठी संदीप यांनी आपल्या कलेचा उपयोग केला आहे. विविध मंडळे, सामाजिक संस्थांनी डाॅ.डाकवे यांना ‘दर्पण’, ‘पत्रकार भूषण’, ‘पत्रकार रत्न’,‘कलारत्न’, ‘कलाविभूषण’, ‘कलागौरव’, ‘पाटण भूशण’ अशा सुमारे 60 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे

चौकटीत : प्रतिवर्षी जाभेंकरांना अनोखे अभिवादन :
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी स्क्रिबलिंग, पेपर कटींग आर्ट, शब्द-लेखणीव्दारे, पोस्टर रेखाटून, रांगोळी इ.माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची सुंदर चित्रे रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

पाटण येथे राष्ट्रवादीचा भव्य सत्कार सोहळा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

पाटण येथे राष्ट्रवादीचा भव्य सत्कार सोहळा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पाटण प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व विविध सहकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर, खा.श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर (संचालक, सातारा जिल्हा मध्य. सह. बॅक) यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ जानेवारी २०२३ रोजी  ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे ठिक दु. १२:३० वा.  संपन्न होणार आहे, अशी माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
               यावेळी बोलताना शेलार म्हणाले, या सत्कार सोहळ्यामध्ये आम्हीं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांचेही सत्कार करणार आहे. हे उमेदवार जरी पराभूत झाले असले तरीही त्यांनी एका प्रचंड धनशक्ती विरुद्ध लढा देऊन तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. राजकारणात हार-जित होत असते. देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) यांची शिकवण आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले तरच पक्ष‌ वाढतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील, माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व खा.श्रीनिवास पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
      या सत्कार सोहळ्यास सर्व संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक,आजी-माजी जि.प./ पं.स.सदस्य, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...