गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची- ह.भ.प. रामदास महाराज

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची- ह.भ.प. रामदास महाराज
तळमावले/वार्ताहर
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. पूर्वीच्या काळी ‘छडी लागे छम छम, विद्या येई घमघम’ अशी म्हण होती. या उक्तीनुसार शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी घडत असत असे मत श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार ह.भ.प.रामदास महाराज आरेवाडीकर यांनी व्यक्त केले.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि डाकवे परिवार यांच्या वतीने वै.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या समाजप्रबोधनपर कीर्तन सोहळयात ह.भ.प.रामदास महाराज बोलत होते. यावेळी त्यांना ह.भ.प.मधुकर महाराज, मोहन आण्णा, ह.भ.प.निवृत्ती महाराज, ह.भ.प.दादा महाराज, ह.भ.प.तुषार महाराज, ह.भ.प.शाहिद महाराज, ह.भ.प.सदाशिव आचरे व अन्य सहकारी यांची सुरेल साथ लाभली. रामदास महाराज यांनी अभंगांचे साध्या सोप्या भाषेत विवेचन करुन लोकांना मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’’ अशी मनुष्याच्या संसाराची अवस्था आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माची सांप्रदायाची आवश्यकता आहे. ‘‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’’ अशा उक्तीप्रमाणे आपण का करत राहिले पाहीजे. नेहमी चांगले कर्म केले पाहजे’’ यावेळी त्यांनी पुराणातील अनेक दाखले देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ह.भ.प.रामदास महाराज म्हणाले, ‘‘वै.राजाराम डाकवे उर्फ तात्यांचा स्वभाव सर्वांना हवाहवासा होता. समाजात त्यांनी लोकांना चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन केले. तात्यांसारख्या व्यकित्मत्त्वाची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे.
या कीर्तन सोहळयाप्रसंगी 30 बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे, भरत डाकवे, प्रकाश चव्हाण, प्रथमेश डाकवे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, वारकरी मंच महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी, डाकेवाडीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि समस्त डाकवे परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घासडाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण

'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास
डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण

फोटो -श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार समितीकडे मदत सुपूर्द करताना डाकवे परिवारातील सदस्य

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे ऊर्फ तात्या यांचे नुकतेच निधन झाले. तात्यांच्या अचानक जाण्याने डाकवे परिवाराला अतीव दुःख झाले. तरीही तात्यांचा समाजसेवेचा, मदतीचा, कर्तुत्वाचा वारसा जोपासत डाकवे परिवाराने अनाथ, निराधारांना स्नेहभोजन देत मायेचा घास भरवण्याचा प्रयत्न केला आहे.  'उत्तर' कार्याचा विधी करत 'माणुसकी' जपली आहे. बनवडी (ता.कराड) येथील अश्विनीताई वेताळ-पाटील यांनी शांताई फौंडेशन च्या माध्यमातून भुकेल्या पोटाची भूक भागवण्यासाठी "फूड बँक"सुरू केली आहे. यामधून निराधार, अनाथ मुलांना स्नेहभोजन दिले जाते.  शांताई फौंडेशन च्या या फूड बँकेला मदत करत दुःखातही डाकवे परिवाराने सामाजिक ऋण जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. 
याशिवाय श्री दत्त मंदिर डाकेवाडीच्या जीर्णोद्धारासाठी "फुल ना फुलाची पाकळी" म्हणून डाकवे परिवाराने रु.5,555/- ची देणगी मंदिर जीर्णोद्धार समितीकडे सुपूर्द केली आहे. यावेळी समितीचे तुकाराम डाकवे (आबा), पांडुरंग जाधव तसेच परिवारातील श्रीमती गयाबाई डाकवे, डॉ.संदीप डाकवे, रेश्मा डाकवे, भरत डाकवे, गौरी डाकवे, विठ्ठल डाकवे, सुमन डाकवे, विश्वनाथ डाकवे, वनिता डाकवे, सविता निवडूंगे, नंदा डाकवे, नंदा चिंचुलकर, अश्विनी डाकवे, ज्योती पाटील, रत्ना काळे, स्पंदन डाकवे, हरिबा डाकवे, लक्ष्मण डाकवे, ज्ञानदेव डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, जिजाबाई मुटल, सुनील मुटल आणि डाकवे परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. 
विशेष म्हणजे डाकवे परिवाराने राजाराम डाकवे यांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले आहे.
फोटो - शांताई फौंडेशन ला डाकवे परिवाराने दिलेल्या मदतीतून निराधार, अनाथ यांना अन्नदान करताना फौंडेशन चे सदस्य

यापूर्वी ही डाकवे परिवाराने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. वडील स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांचे संस्कार आणि शिकवण यामुळेच अशा प्रकारचे उपक्रम राबवणे शक्य होते अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ.संदीप डाकवे यांनी यावेळी दिली आहे.
पारंपरिक रूढी, रीतिरिवाज परंपरा जपत नाविन्याचा ध्यास घेत 'उत्तर' कार्याला 'माणुसकी' जपत सामाजिक ऋण फेडण्यासाठी राबवलेला उपक्रम स्तुत्य असाच आहे. त्याचप्रमाणे श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. रामदास महाराज यांच्या हरिकीर्तनाचे आयोजन केले आहे. डाकवे परिवारावर दुःखाची छटा असताना सामाजिक ऋण फेडण्यासाठी राबवलेले उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत. समाजाने अशा उपक्रमाचे अनुकरण करावे. 

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन

स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम विठ्ठल डाकवे ऊर्फ तात्या यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दि.25 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 9.00 वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकवे परिवाराने दिली आहे. आरेवाडी ता.पाटण येथील श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह. भ.प.रामदास महाराज यांचे कीर्तन होणार असून त्यांना या संस्थेतील शिक्षण घेत असलेल्या बाल वारकऱ्यांची साथ लाभणार आहे. 
स्व. राजाराम डाकवे हे समाजशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा ज्ञानेश्वरी पारायण, धार्मिक उत्सव यात सहभाग होता. त्यांना अध्यात्मची विशेष आवड होती. त्यामुळेच डाकवे परिवाराने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरिकीर्तनाचे आयोजन केले आहे. श्री दत्त मंदिर डाकेवाडीच्या जीर्णोद्धारासाठी "फुल ना फुलाची पाकळी" म्हणून परिवाराने रु.5,555/- ची देणगी दिली आहे. विशेष म्हणजे डाकवे परिवाराने राजाराम डाकवे यांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता त्यामध्ये वृक्षारोपण करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 
श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प.रामदास महाराज यांच्या मु. डाकेवाडी, पोस्ट काळगाव, ता.पाटण, जि. सातारा येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डाकवे परिवाराने केले आहे.

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्नासंदर्भात राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी करणार -मंत्री शंभूराज देसाईंलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो

सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्नासंदर्भात राज्य शासन  केंद्राकडे आग्रही मागणी करणार -मंत्री शंभूराज देसाईं

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची  ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो



 पाटण दि.17 शेतकऱ्यांच्या उसाला एफ. आर.पी. प्रमाणे  योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी  साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे.राज्य शासन सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.सध्या देशात ८५ लाख  टन साखर शिल्लक आहे मात्र केंद्रसरकारकडे सहकारातील अद्याप ही काही प्रलंबित प्रश्न असून हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.दरम्यान राज्यातील भाजप -सेना युतीचे हे सरकार राज्यातील सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम पणे असल्याचे ही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

                  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्र दौलतलोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पार पडलीयावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाईअशोकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,शशिकांत कदम,सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,संचालिका श्रीमती जयश्री कवर,सौ.दिपाली पाटील,बबनराव शिंदे,मधुकर पाटील,विजयराव जंबुरे,अभिजित पाटील,सुरेश पानस्कर,ॲङमिलिंद पाटील,चंद्रकांत पाटील, प्रकाशराव जाधव, मधुकर पाटील यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

              यावेळी बोलताना मंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफ.आर.पी. प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे,याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफ आर पी चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणा संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. साखर निर्याती संदर्भातील केंद्राने अडचणी दूर केल्यास राज्यातील साखर कारखानदारी अडचणीतुन बाहेर येण्यास मदत होईल.त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच यासंदर्भात केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.  मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातील भाजप सेना युती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही देवुन मंत्री ना.देसाई म्हणाले  प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.

यशराज देसाई यांनी, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. सध्या हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्याचे असून पहिल्या टप्प्याचे काम ऐंशी टक्के झाले असून उर्वरित वीस टक्के काम पूर्ण करणार आहे. तसेच, दुसर्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कारखान्या च्या या विस्तारीकरणामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. ही वाढ झाल्यास सभासद शेतकर्यांच्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत होण्या स मदत होणार आहे. यंत्रणेच्या तुटवड्याबाबत बोलताना ते म्हणाले, यंत्रणेचा तुटवडा हा केवळ देसाई कारखान्यालाचं नव्हे तर राज्यातील सर्व कारखान्यांना मध्ये आहे. मात्र यावरती तोडगा काढण्यासाठी देसाई कारखान्याचा हायवेट्ररच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने देशातील साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातल्याने अनेक कारखानदारांना साखरेचा कोटा शिल्लक असताना ही निर्यात बंदी मुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी एफ आर पी शंभर टक्के देण्यात आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र देसाई कारखाना येत्या दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना एफ आर पी ची शंभर टक्के रक्कम देण्यासाठी कटीबद्ध असणार आहे असं सांगितले.

           दरम्यान या सभेत विषयपत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यामध्ये,मंत्री शंभूराज देसाई यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून आणि यशराज देसाई यांची लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.दरम्यान कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 सहन करण्याची क्षमता संपल्यानेच   राज्यातील   महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो

महाराष्ट्राला नवी दिशा देताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचे नंदनवन केले आणी खऱ्या अर्थाने तालुका उभारला मात्र पाटणकरांनी लोकनेत्यांना धोका दिला. ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले त्यांच्याशी दगाबाजी केली गेली.संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करून बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकनेत्यांच्या विरोधात कट कारस्थाने, दगाबाजी केल्याने लोकनेते शेवटच्या निवडणूकित सहा हजार मतांनी निवडून आले. मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे दोन नंबरचे पद लोकनेत्यांचे होते. ज्यांनी दगाबाजी केली त्यांच्या मांडींला मांडी लावून आम्ही कदापी बसणार नाही.मात्र अडीच वर्षे तोंड धरून बुक्क्यांचा मार सहन करीत आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो.  मात्र त्यानंतर सहन करण्याची क्षमता संपल्यानेच   राज्यातील   महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो.अशी जोरदार टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट चा उद्या 15 वर्धापनदिन

तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट चा उद्या 15 वर्धापनदिन
तळमावले दि.7 ता.पाटण येथील नावाजलेली मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्थेचा 15 अमृतमहोत्सवी वर्धापनदिन आज तळमावले येथे आज संपन्न होणार असून 
मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनिल शिंदे यांनी सत्यनारायण पूजा आयोजित केली असून भागातील सर्व सभासद, ठेवीदार,खातेदार,व्यापारी,शेतकरी यांना निमंत्रित केले असून
 संस्थेचा पंधरावा  वर्धापनदिन.पाहता सर्वांच्या नजरेसमोर ही विश्वासार्ह वाटचाल 15 वर्षांची झाली.एक सामाजिक व सहकार क्षेत्रात अग्रगण्य ही संस्था नावारूपास आली आहे.
सन २०१९- २० व २०२०-२०२१ ही दोन आर्थिक वर्षे करोनाच्या महामारीनेने ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही
अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान 
मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्थेने आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णु केला आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...