मंगळवार, २३ मार्च, २०२१

तळमावले : दिव्यांगांने केले मदतीचे आवाहन कॉलेजला जाण्यासाठी हवी स्कूटर


 
चाळकेवाडी ता.पाटण : दि.23 अपंग! शब्द फक्त तीन अक्षरी. उच्चारण्यासाठी किती सहज सोपा. पण तितकाच या अपंगत्वाचा अनुभव घेणे कठीण व दु:खद. काहीजण जन्मत:च अपंग असतात तर काही अपघाताने अपंग होतात. पण संबंध थेट अपंगत्वाशीच! कधी कधी त्या विकलांग जीवाला समाजाचा अपमान, अवहेलना सहन करावी लागते. समाजात सतत त्याच्या विकलांगतेची जाणीव त्याला करून दिली जाते. या अवहेलनेत काही अपंग खचतात. पण अशातही काहीजण जिद्दीने पुढे जातात.
हाताने, पायाने अपंग दिसणारी माणसे मनाने कधीच अपंग नसतात. अपंग असतो तो फक्त त्याची अवहेलना करणारा धडधाकट माणूस. खरं तर खरा आत्मविश्वास, खरी चिकाटी व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही एखाद्या धडधाकट व्यक्तीपेक्षा एखाद्या अपंगातच जास्त असते.
अपंग असूनही केवळ मेहनतीच्या जोरावर 
दहावी-बारावीमध्ये चांगले गुण मिळवून पास होणाऱ्या विद्यार्थीची  संख्या कमी नाही. म्हणतात ना 'इच्छा तेथे मार्ग' याचं ताजं उदाहरण सौरभ दीपक चाळके वय 19 वर्ष रा.चाळकेवाडी (कुंभारगाव ) ता.पाटण हा विद्यार्थी जन्मापासूनच दोन्ही पायांनी 85% अपंग आहे तरी त्याने जद्दीच्या जोरावर पहिली ते सातवी शिक्षण चाळकेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले आणि आठवी ते दहावी शिक्षण श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगाव येथे पूर्ण केले  आत्ता  सौरभ काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले येथे 13 वी (FYBA) च्या वर्गात शिकत आहे प्राथमिक शिक्षण शिकत असताना त्याला ग्रामपंचायतिमधून तीन चाकी सायकल मिळाली होती.महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्याला त्यांचे आजोबा रोज कॉलेज मध्ये घेऊन जात आणि कॉलेज झाल्यावर घरी घेऊन येत हा नित्यक्रम असायचा पण आत्ता आजोबाच आजारी झाली आहेत घरची परिस्थिती बेताची वडील मजुरी करतात शिकण्याची इच्छा आहे पण कॉलेजला जाणार कसे ह्या काळजीत सौरभ  होता त्यामुळे त्याने अपंगांसाठी तीन चाकी स्कुटर संदर्भातील माहिती मिळवली तर ती स्कुटर घेण्यासाठी त्याला 1लाख 3 हजार रुपये खर्च येतो असे समजले त्यानंतर त्याने मदतीसाठी एक पत्र लिहिले व सोशल मीडियावर अपलोड केले आहे. त्यामध्ये त्याने आपली सत्य परिस्थिती काय आहे ते लिहिले आहे.व मदत करण्याचे आवाहन केले आहे.मदतीसाठी त्याने आपले बँक खाते दिले आहे.

बँकेचे नाव.:- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि. सातारा
खातेदाराचे नाव : सौरभ दीपक चाळके

खाते क्रमांक: 1184006009097

IFSC CODE :-SDCE0000001

मो.नंबर : 8698272324
              9923929539
हे असून खात्यावर पैसे जमा केल्यावर फोन किंवा व्हाट्सएपवर मेसेज पाठवावा असे शेवटी सौरभ ने लिहले आहे
आपण दिलेल्या मदतीने सौरभ आपले शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी जीवन जगू शकतो. कृपया त्याला मदत करा असे आवाहन "साप्ताहिक कुमजाई पर्व" ने केले आहे
सौरभने लिहलेले पत्र 
पाटण तालुक्यातील बातम्यासाठी आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये ऍड करा 8108253323 
साप्ताहिक कुमजाई पर्व


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...