तळमावले/डाॅ.संदीप डाकवे
मरळी येथे तुकाराम पांडूरंग कदम यांच्या घरातील पाळीव कुत्रा यावर बिबटयाने हल्ला करुन त्याला जखमी केले आहे. काल (मंगळवार दि.2 मार्च रोजी) रात्री 10.30 च्या दरम्यान त्यांच्या घरातील सर्वजण जेवायला बसले होते. त्यावेळी बाहेर असणारा त्यांचा कुत्रा भुंकत आत आला. त्यामुळे सर्वजण बाहेर गेले तर त्यांच्यासमोर बिबटया असलेला दिसला. आरडाओरडा करुन त्यांनी बिबटयाला पळवून लावले. मात्र रात्री 12.30 च्या दरम्यान बिबटया पुन्हा त्या ठिकाणी आला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आज येथे तर उद्या दुसरीकडे बिबटया दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत. दरम्यान, सकाळी वनविभागाचे कर्मचाÚयांनी घटनास्थळी भेट दिली.
सध्या ज्वारीचे पीक काढणीच्या अंतीम टप्प्यावर आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग डोळयात तेल घालून रात्रंदिवस पिकाची राखण करत आहे. मात्र बिबटयाच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग पुरता घाबरुन गेला आहे.
यापूर्वीही मरळीच्या शिवारामध्ये बिबटयाचा वावर असून अनेकवेळा शेतकÚयांना बिबटया दिसत आहे. त्यामुळे शेतकÚयांमध्ये दहशत निर्माण झाली असून या परिसरात सातत्याने बिबटयाने शेतकÚयांच्या शेडमधील जनावरे, कोंबडया पाळीव श्वान यांच्यावर हल्ले करुन त्यांना फस्त केले आहे. परिसरामध्ये बिबटयाच्या पायाचे ठसे आढळून येत आहेत. मानवी वस्तीनजिकचा बिबटयाचा नित्य वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अनेक गावांत बिबटयाची डरकाळी नित्याची झाली असून यामध्ये शेतकÚयांचे पशुधन नष्ट होत आहे. बिबटयाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज विभागातील शेतकÚयांतून व्यक्त होत आहे.
या विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबटयाने हल्ले करुन त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. यापूर्वी बिबटयाचा वावर होता परंतू पुरावा नव्हता. रात्री बिबटयाला पळवून लावताना त्याचे मोबाईलवरुन फोटो काढण्यात यश मिळाले. वनविभागाकडून शेतकÚयांना मिळणारी भरपाई तुटपंुजी आहे. वन विभागाने परिसरात वावरत असलेल्या बिबटयाचा बंदोबस्त करुन नुकसानग्रस्त शेतकÚयांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून होत आहे.
-संजय पाळेकर, प्रत्यक्षदर्शी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा