*तळमावले : चिखलेवाडी ग्रामपंचायतीची जलजीवन मिशन योजनेत निवड :*
*वरेकरवाडी जवळील तलावास दुरुस्ती करीता मिळणार 10 लाखाचा निधी*
कुंभारगाव : चिखलेवाडी ग्रामपंचायत ता.पाटण येथील पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्था पूर्ण होण्यासाठी प्रथम गावाचा समावेश हा जलजीवन मिशन योजनेत होणे आवश्यक होते.त्याबाबतचा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मा.श्री.रमेश मोरे बापू यांच्या पुढाकाराने खासदार मा.श्री. श्रीनिवास पाटील साहेब यांच्याकडे देण्यात आला होता.
खासदार साहेबांनी या पत्राचा पाठपुरावा करून या जलजीवन मिशन योजनेत चिखलेवाडी गावाचा समावेश करण्यात आला आहे.तद्नंतर दि.19 मार्च रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये वरेकरवाडी जवळील असलेल्या ग्राम तलावाला गळती लागल्यामुळे पुरेसे पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे यावर ग्रामपंचायतिचा ठराव घेऊन सदर तलावातील गाळ काढणे व गळती दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्याचे निवेदन खा.श्री .श्रीनिवास पाटील यांच्याकडे देण्यात आले त्यांवर खासदार साहेबानी त्या निवेदनाचा पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये समावेश करून रुपये 10 लक्ष निधीची तरतूद करून ह्या कामास प्राधान्य द्यावे असा पत्रव्यवहार केला आहे. या गोष्टी चिखलेवाडी ग्रामपंचायतीच्या दृष्टीने फार महत्वाच्या होत्या. म्हणून याचा पाठपुरावा केल्याबद्दल
मा.श्री.खासदार श्रीनिवास पाटील साहेब
मा.श्री.रमेश मोरे मा.उपसभापती पं.स.पाटण
आणि ग्रामपंचायत चिखलेवाडीचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
*जलजीवन मिशनचे उद्दिष्ट*
जलजीवन मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना असून त्यामध्ये राज्य आणि केंद्राचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे. 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतिव्यक्ती रोज किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे."हर घर नल से जल' असे घोषवाक्य घेऊन 2020-21 पासून जलजीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सर्व परिस्थितीत शाश्वत पद्धतीने मिळावा, असे मोठे उद्दिष्ट जलजीवन मिशनचे आहे.''
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा