*एक लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न आहे ! रेशनकार्ड होणार रद्द*
सरकारी-निमसरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱयांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असणाऱया धारकांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. या उत्पन्नाच्या गटातील कार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द होणार आहे, मात्र त्यांच्या मागणीनुसार दुसरे रेशनकार्ड दिले जाईल.
शहरात राहणाऱया रेशनकार्डधारकांना आता फॉर्मसोबत निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयके, टेलिपह्न मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे द्यावी लागणार असून जे रेशनकार्डधारक या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणार नाहीत त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार असून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा असेदेखील शासननिर्णयात म्हटले आहे. कोणत्याही विदेशी नागरिकाकडेदेखील रेशनकार्ड नाही ना याचीदेखील आता माहिती घेतली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा