कराड तालुक्यातील उंडाळे गावचे रहिवासी असलेल्या विलासराव पाटील उंडाळकर काका नावाने ओळखले जात असत. त्यांनी 1967 झाली राजकारणात प्रवेश केला होता. सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशके ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. 1967 साली जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर जवळपास तेरा वर्ष सक्रिय राजकारणात ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग 35 वर्ष त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते.
मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर यांचे प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा