शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

ग्रामपंचायत निवडणूक ; पाटण तालुक्यातून 107 ग्रामपंचायतींच्या 809 जागांसाठी 1 हजार 675 अर्ज,

ग्रामपंचायत निवडणूक ; पाटण तालुक्यातून 107 ग्रामपंचायतींच्या 809 जागांसाठी 1 हजार 675 अर्ज
सातारा दि.31;- सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 हजार 264 सदस्य पदासाठी रेकॉर्ड ब्रेक सुमारे 17 हजार 883 उमेदवारी अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायतींच्या मूळ जागांच्या दुपटीहून अधिक अर्ज सादर झाल्यामुळे अर्ज छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्राथमिक अंदाजानुसार छाननीवेळी अनेक अर्ज बाद झाल्याने निवडणूक रणांगणापूर्वीच शेकडोे उमेदवारांच्या दांड्या गुल झाल्या.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावची निवडणूक हा लोकशाही उत्सव समजून जिल्ह्यातील काही ठिकाणाहून इच्छुक उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.तालुक्यातून 130 ग्रापंचायतींच्या 1 हजार 46 जागांसाठी 2 हजार 259 अर्ज, जावली तालुक्यातून 75 ग्रामपंचायतींच्या 545 जागांसाठी 745 अर्ज, कोरेगाव तालुक्यातून 56 ग्रामपंचायतींच्या 468 जागांसाठी 1 हजार 156 अर्ज, कराड तालुक्यातून 104 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 24 जागांसाठी 3 हजार 171 अर्ज, पाटण तालुक्यातून 107 ग्रामपंचायतींच्या 809 जागांसाठी 1 हजार 675 अर्ज, वाई तालुक्यातून 76 ग्रामपंचायतींच्या 606 जागांसाठी 1 हजार 151 अर्ज, खंडाळा तालुक्यातून 57 ग्रामपंचायतींच्या 461 जागांसाठी 1 अर्ज 468, महाबळेश्वर तालुक्यातून 42 ग्रामपंचायतींच्या 296 जागांसाठी 376 अर्ज, माण तालुक्यातून 61 ग्रामपंचायतींच्या 529 जागांसाठी 1 हजार 380 अर्ज, खटाव तालुक्यातून 2 हजार 94 अर्ज, फलटण तालुक्यातून 80 ग्रामपंचायतींच्या 712 जागांसाठी 2 हजार 408 अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या 7 हजार 264 जागांसाठी 17 हजार 883 उमेदवारी अर्ज दाखल झाले.जिल्हा प्रशासनाकडे सादर झालेल्या या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर सुरू झाली. दाखल केलेल्या अर्जासोबतची कागदपत्रे, उमेदवाराने भरलेली माहिती तपासण्यात आली. अर्ज वैध, अवैध ठरवताना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना उमेदवार व गावकारभार्‍यांच्या शंकांचे निरसन करावे लागले. एकेका तालुक्यातून हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...