शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

तळमावले ; कोरोना विरुद्धच्या लढ्यात गाव एकवटला लोकवर्गणीतून घेतल्या ऑक्सिजन मिशन


तळमावले / प्रतिनिधी दि.26 कुंभारगाव चिखलेवाडी(ता.पाटण) : पाटण तालुक्‍यात कोरोना रुग्णांचा वेग वाढतंच चालला आहे. कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे.  गावोगावी रुग्णसंख्या ही वाढत आहे. त्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासना सोबत चिखलेवाडी ग्रामपंचायत सुद्धा एकवटली आहे.गावातील तरुण,ग्रामस्थांनी एकत्र येऊन  ऑक्‍सिजन मशिन खरेदी करून त्या रुग्णसेवेत रुजू केल्या आहेत. यानिमित्ताने चिखलेवाडी  ग्रामपंचायतीने राबवलेला उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

लोकवर्गणीतून ऑक्‍सिजन मशिन पुरवणारे परिसरातील हे पहिलीच ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीने एकत्रित येत कोविड रुग्णांसाठी ऑक्‍सिजन मिळावा, यासाठी  ऑक्‍सिजन मशिन घेतल्या आहेत. त्यासाठी लागणारा  दिड लाख रुपये निधी जमा करण्यासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक होऊन त्यात लोकवर्गणीमधून यंत्रसामग्री घ्यायचे ठरले.

ऑनलाईन पद्धतीचा वापर करून समाजातून पैसे जमा करण्यात आले. या लोकवर्गणीतून युवकांनी दोन मशीन घेतल्या आहेत. त्या मशिन चालवण्याचे प्रशिक्षण गावातील आशासेविकांना देण्यात आले आहे.  तसेच या राहिलेल्या रकमेतून पी. पी. ई. किट, थर्मल स्कॅनर, कोरोना प्रतिबंधक गोळ्या  खरेदी केलेले आहेत.लोकवर्गणीतील रकमेचा कोरोना रुग्णांसाठी ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी आवश्‍यक साहित्याची खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

तसेच भविष्यात अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून करण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले .ज्यांना कोणाला या सामाजिक उपक्रमासाठी मदत करायची असेल त्यांनी खालील अकाउंट नंबर वर पैसे पाठवून पावती व्हाट्सउप करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे

--------------------------------

प्रा. सुरेश यादव.

9764662218 ( Google pay)

Name - Suresh Raghunath Yadav

Bank name - Bank of Maharashtra

Account number - 25025794045

IFSC code - MAHB0000551

---------------------------------

श्री. रवींद्र माटेकर.

Ravindra Matekar

Union bank of India

Princess street branch

A/C NO. 319102010802536

Ifsc- UBIN0531910

9167576742 ( phone pay)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...