बुधवार, १७ जून, २०२०

कुंभारगाव : किशोर मोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

किशोर मोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

तळमावले/वार्ताहर
चिखलेवाडी नं.3 (कुंभारगांव) येथील तरुण किशोर मोरे यांनी जि.प.प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य देत समाजाप्रती आभार व्यक्त केले.
नेहमीच विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या किशोर मोरे यांचा वाढदिवस नुकताच झाला. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेतील मुलांना आपण शिकताना ज्या अडचणी आल्या त्या येवू नयेत यासाठी सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत त्यांनी ‘मदत नव्हे तर कर्तव्य’ भावनेतून इ.1 ली ते 7 वी पर्यंत  सर्व शैक्षणिक साहित्य मुलांना देण्यात आले.
मुलांना शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर एकप्रकारचे समाधान किशोर मोरे यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शैक्षणिक साहित्य वाटण्यासाठी किशोर मोरे मित्रपरिवाराकडून विशेष सहकार्य करण्यात आले. या उपक्रमाचे परिसरातील मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

1 टिप्पणी:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...