शनिवार, १६ मे, २०२०

तळमावले - कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे : योगेश पाटणकर

तळमावले ता.पाटण : देशात फैलावलेल्या "कोरोना" व्हायरसच्या प्रादुर्भावाचा बिमोड करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पाटण तालुक्यातील तळमावले आणि काळगाव परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील  आशा वर्कर्सना सुरक्षिततेच्या दृष्टीने व प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असताना त्यांचे आरोग्य सुरक्षित राहून जनतेची सेवा व्यवस्थित रित्या करता यावी यासाठी राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेशजी पाटणकर​ ​यांचे लक्ष वेधले होते.​ ​त्यानुसार त्याच्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून दि.१५ मे रोजी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील कर्मचारी,आशा वर्कर्सना सरपंच, पोलीस पाटील यांना  फेस सिल्ड ​मास्क्स,सॅनिटायझर,हँडग्लोज, टेम्परेंचर काउन्ट मशीन, पी.पी.एम किट,
आरोग्य केंद्रतील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. 

यावेळी बोलताना पाटणकर म्हणाले की  जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी स्वत​:​चा जीव धोक्यात घालून प्रशासनाच्या बरोबरीने अहोरात्र काम करणाऱ्या तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी आशा सेविका, अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील, यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे "सलाम आपल्या कार्याला" आपण सर्वांनी कोरोना सोबत जगायला शिकले पाहिजे.
कारण स्वतःचा बचाव करणे हीच एक गोष्ट आहे त्यामुळे आपण कोरोना वर मात करू शकतो 

​ ​यावेळी योगेशजी पाटणकर यांच्या समवेत सचिन काजरी (ऊपाअध्यक्ष), नानासाहेब काजारी,प्रवीण पाचुपते,संदीप टोळे,रमेश डीसले,श्रीरंग चाळके,सतिष वाघ, सुरेश कदम,यांच्या बरोबर पत्रकार नितीन कचरे,जयभीम कांबळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...