शुक्रवार, १५ मे, २०२०

सातारा : कारागृहातील एक निकट सहवासित कोरोना बाधित;115 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 8 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

कारागृहातील एक निकट सहवासित कोरोना बाधित;
115 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 8 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 

सातारा दि. 15  : सातारा जिल्हा कारागृहातील निकट सहवासित 26 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
115 जणांचा अहवाल निगेटिव्ह
तसेच वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 99, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 
8 जण विलगीकरण कक्षात दाखल
काल दि. 14 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 78, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 45, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...