नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने आज सकाळी फेटाळली. फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्यात यावे अशी विनंती त्यानं या याचिकेतून कोर्टाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने पवनची याचिका फेटाळली. तसेच उद्या फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यानंतर आता पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे उद्या चारही दोषींना फासावर चढवणार यावर शिक्कामोर्बत झालं आहे. जल्लाद पवनने देखील आज तिहार तुरुंगात दोषींच्या डमीला फाशी देऊन प्रात्यक्षिक केले आहे.
यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी करत २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, कोर्टाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे. कोर्टाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.
न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हा निर्णय एकमताने दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा