मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडीचा अपघात टळला असून मोटरमनच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाली असताना मोठा आवाज झाला आणि मोटरमनने तातडीने ब्रेक दाबले. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने आज सकाळच्या सुमारास एक लोकल निघाली.
लोकल काही अंतर घावून गेली आणि एक मोठा आवाज झाला. हा आवाज झाल्यानंतर मोटरमनने तातडीने लोकल थांबवली. मोटरमनने गाडीतून खाली उतरून रेल्वे मार्गाची पाहणी केली तर रेल्वे रुळाला मोठा तडा गेल्याचे दिसले. त्यांनी लगेचच रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रुळ दुरुस्ती केली. त्यानंतर यामार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू कण्यात आली आहे. बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ उशिराने धावत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा