शनिवार, २८ मार्च, २०२०

धक्कादायक:.नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला झाला कोरोना

नवी मुंबई : मुंबई आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहे. नवी मुंबईत एका कुटुंबातल्या दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या कुटुंबातल्या तिघांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईतला हा 8वा कोरोनाबाधित रुग्ण आहे. आता या चौघांवरही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत आज विदेशातून आलेले 95 नागरीक आढळून आलेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

नवी मुंबईतल्या एका मशिदीमध्ये फिलिपाईन्सचा नागरीक आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याच्यामुळे मशिदीतल्या मौलानांना लागण झाली. नंतर त्यांचा मुलगा, सून आणि आता नातवालाही लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

8 कोरोना बाधित रुग्ण

-- 1 फिलिपाईन्स नागरिकांचा मृत्यू

-- 690 नागरिक होम कोरोंटाइन मध्ये

-- 9 नागरिक कस्तुरबा रुग्णालयात सध्या दाखल

-- 8 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत

-- 81 जण अलगिकरण कक्षात उपचार घेताहेत

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज पुन्हा भर पडली आहे. दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. त्यांना भाभा रुग्णालयात आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 86 झाली आहे. काल मुंबईत एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शहरात आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहेत. राज्यातच नाही तर देशात हा सगळ्यात जास्त आकडा आहे.

मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...