पाटण प्रतिनिधी ;- कोयना धरण शिवसागर जलाशयातील गेल्या पाच वर्षांत बंद पडलेले बोटिंग पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील बैठक आज दि. 3 मार्च रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यामुळे कोयनेचे बोटिंग पूर्वीप्रमाणे सुरू होईल, अशी माहिती माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोयना धरण शिवसागर जलाशयात यापूर्वी सलग पंचावन्न वर्षे अविरतपणे जलवाहतूक सुरू होती. परंतु अचानकपणे गेल्या पाच वर्षांत हे बोटिंग बंद करण्यात आले. त्यामुळे शेकडो स्थानिक लोक बेरोजगार झाले. धरणातंर्गत गावांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला. निसर्ग संपत्तीने नटलेल्या कोयना पर्यटन क्षेत्रातील पर्यटन व पर्यटकांची गैरसोय झाल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे.त्यामुळे हे बोटिंग तातडीने सुरू करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी विचारात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानभवनात बैठक बोलावली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील हा प्रलंबित प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कोयना विभाग स्थानिकांना व पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांना न्याय मिळणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा