सातारा : राज्यात लवकरच पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडणार आहे.या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.तर अनेकांनी तिकिटासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
दरम्यान भाजपमध्ये या निवडणुकीसाठी अनेक नेते इच्छूक आहेत.त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून कमी नेते इच्छूक आहेत.दरम्यान आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे चिन्ह आहे.त्यातच आता राष्ट्रवादीकडून काही नेत्यांच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.
सारंग पाटील आणि उमेश पाटील यांचे नाव सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे.सारंग पाटील हे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत.गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून निसटता पराभव झाला होता .
दरम्यान असे असले तरी सारंग पाटील यांचे चांगले जाळे या मतदारसंघात तयार झाले आहे.त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.या मतदारसंघात सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मतदारांचा समावेश होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा