"कुमजाई पर्व न्यूज टीम"
मान्याचीवाडी ,कुंभारगाव
कुंभारगाव/प्रतिनिधी
तुकाराम बीज”.श्री संत तुकाराम महाराज सदेही वैकुंठाला गेले. तुकारामांना शतश: प्रणाम आणि साष्टांग दंडवत. त्याचेच स्मरण म्हणून सर्व वारकरी हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून साजरा करतात. कित्येक दिवस आधीपासूनच महाराष्ष्ट्रात विविध ठिकाणी गाथा पारायण, हरिनाम सप्ताह यासारखे कार्यक्रम चालू होतात. त्याचं अनुषंगाने मान्याचीवाडी,कुंभारगाव ता.पाटण येथे कै. येसुबुवा ऊर्फ साधुबाबा आणि वै.तातुबुवा कवर (झेडेकरी) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दि.४ मार्च पासून "
श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण
वअखंड हरिनाम सप्ताहसोहळा संपन्न होणार आहे.
सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत. ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी यांच्या सहकार्याने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाचे हे ३२वे वर्षे आहे
या सप्ताहामध्ये अखंड वीणावादन, पहाटे काकडा, आरती, सकाळी गाथा वाचन, गाथा भजन, महिला भजन, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, संध्याकाळी हरिकीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत
सप्ताहामध्ये ह.भ.प. सुखदेव यादव महाराज (देवाची आळंदी ),हारपळकर महाराज (देवाची आळंदी ) यांचे मोलाचे योगदान असते
व्यासपीठ चालक ह.भ.प.लहूदास महाराज शेळके ,विकास महाराज केसरे सेवा देणार आहेत तसेच कुंभारगाव पंचक्रोशीतील सर्व टाळकरी, माळकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभते बुधवार दि.११ मार्च तुकाराम बीज दिवशी सकाळी ८ते १० गावातून दिंडी सोहळा १०:३० ते १२ ह.भ.प.नानाभाऊ गोफणे यांच्या काल्याच्या कीर्तन त्यानंतर बीजेची फुले वाहून महाप्रसाद होईल आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविकानीं ह्या ज्ञानदानाचा लाभ घ्यावा असे आहवान ग्रामस्थ मंडळ मान्याचिवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाप्रसाद कै.जिजाबाई आबा माने
यांचे स्मरणार्थ श्री कृष्णा आबा माने यांचेकडून आहे.